सुरवसे प्रशालेमध्ये चित्रकला, रंगभरण स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
By Kanya News||
सोलापूर : होटगी रोडवरील सुरवसे प्रशालेमध्ये माजी आमदार दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चित्रकला व रंगभरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुरवसे बालक मंदिर सुरवसे प्राथमिक व सुरवसे हायस्कूल या तिन्ही विभागातून बहुसंख्येने विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते .
या स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी संचालक पांडुरंग चौधरी, प्राचार्य उज्वला साळुंखे, गुरुकुल कॉम्प्युटरचे सचिन चौधरी, गौरव समितीचे अंबादास रेडे, ज्येष्ठ शिक्षक विनायक घाडग, ज्येष्ठ शिक्षिका सुजाता लोंढे, श्याम पाटील यांची यांची प्रमुख उपस्थिती होती\ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवीच्या मूर्तीची पूजन करण्यात आले यावेळी माजी आमदार दिलीपराव माने हे स्वतः येऊन त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी प्राचार्या उज्वलाताई साळुंखे यांनी माजी आमदार दिलीपराव माने यांचासत्कार केला. यावेळी प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.