क्लबचे अध्यक्ष विपुल मिरजकर यांचे स्तुत्य उपक्रमाचे कौतुक
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सोनू सूद चॅरिटी क्लब, सोलापूर टीमच्यावतीने सोलापूर आणि पंढरपूर येथे गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. शिक्षणासाठी आवश्यक साधनं उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी सोनू सूद चॅरिटी क्लबचे अध्यक्ष विपुल मिरजकर, आनंद पवार, ज्योती कालुबरमे, भास्कर नडीमेटला, अजय मद्दली, शुभम सब्बन, राधाराणी रापेल्ली, देविका धक्का, तृप्ती आण्णे, आकांक्षा मोरे उपस्थित होते.
या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुललेला दिसून आला. त्यामुळे क्लबच्या सामाजिक बांधिलकीला बळ मिळाल्याचे विपुल मिरजकर यांनी सांगितले.