लिगाडे मेडिकल कन्सल्टन्सीतर्फे शुक्रवार, दि. १८ जुलै रोजी आयोजन
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : लिगाडे मेडिकल कन्सल्टन्सी यांच्यातर्फे मेडिकल कॉलेजच्या प्रवेशासंदर्भात विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार, दि. १८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ ते ४ यावेळेत हिराचंद नेमचंद वाचनालय येथे मोफत सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती लिगाडे मेडिकल कन्सल्टंन्सीचे समुपदेशक चिदानंद सुंटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या शिबिरात तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिरांतर्गत भारतासह प्रदेशात मेडिकल कॉलेजच्या प्रवेशासाठी कोणत्या व कसे संधी उपलब्ध असतात, याविषयी संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येत आहे.
या शिबिरामध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस व डिप्लोमा, पदवीधर (बॅचलर) असे दोन्ही फार्मसी (MBBS, BDS,BHMS, Both D.B. Pharmacy) या कोर्सेसबद्दल विशेष समुपदेशन करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी मुख्य प्रवक्ते बाकलीवाला संस्थेचे संचालक अभिषेक सिन्हा, चाटे क्लासेसचे प्रा. सतीश काळे, डॉ. सुरेश कोरे, अमर बिराजदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच लिगाडे मेडिकल कन्सल्टन्सीचे संचालक महादेव लिगाडे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबिरांतर्गत मेडिकल कॉलेजच्या प्रवेशासाठी भारतासह परदेशात विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध आहेत. परदेशांमध्ये विशेषता रशिया, जॉर्जिया, नेपाळ व इतर देशांमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. भारत देशामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरातमध्ये उपलब्ध अनेक मेडिकलच्या जागा यासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येणार आहे.
लिगाडे मेडिकल कन्सल्टन्सीमार्फत मेडिकल कॉलेजचे ए, बी, सी (A,B,C) कॅटेगरीच्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्याच्या चॉईसप्रमाणे त्यांनी निवडलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश कसे मिळेल, याविषयी संपर्ण समुपदेशन करण्यात येणार आहे.
तरी मेडिकल कॉलेजला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी (7775864949) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लिगाडे मेडिकल कन्सल्टसीचे व्यवस्थापक चेतन माविनमर यांनी केले आहे.