जेईई मेनमध्ये आकाश इन्स्टिट्यूट सोलापूरचे घवघवीत यश
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : जेईई मेन फेज-१ च्या परीक्षेत आकाश इन्स्टिट्यूट सोलापूरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. सोलापूर शाखेतील जेईई मेन फेज-१ मध्ये पारस गोरे ( ९९.९७ %), संदेश शेटे ( ९९.८५ %), सोहम पुंजाल (९९.३७ %), राही बिराजदार (९९.२० %), गौरवसिंग दलवाले (९९. १ %) गुण प्राप्त केले आहे.
या यशस्वी विद्यार्थांचा सहाय्यक संचालक दीपक सिक्रोरिया यांनी सत्कार करून त्यांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे कौतुक केले.दीपक सिक्रोरिया म्हणाले, हे उत्कृष्ट निकाल हे सिद्ध करतात की आकाश इन्स्टिट्यूट सोलापूर केवळ एनईईटीच (NEET) नाही तर जेईईच्या (JEE) तयारीतही अग्रेसर आहे. आमच्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कामगिरी करताना पाहून आम्ही रोमांचित आहोत आणि हा वारसा पुढे चालू ठेवण्यास उत्सुक आहोत. आकाश इन्स्टिट्यूट सोलापूरमध्ये प्रवेश सुरु आहे. आकाश इन्स्टिट्यूट सोलापूर आता आठवी, दहावी, अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जेईई ( JEE) आणि एनईईटीच्या (NEET) तयारीसाठी प्रवेश स्वीकारत आहे. इच्छुक पालक आणि विद्यार्थी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शाखेला भेट देऊ शकतात किंवा (९०७८८८५५७३) या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. आकाश इन्स्टिट्यूट सोलापूरमध्ये सामील व्हा आणि शैक्षणिक उत्कृष्टतेच्या प्रवासाला सुरुवात करा! असे आवाहनही दीपक सिक्रोरिया यांनी केले आहे.