श्राविका शिक्षण संकुलात भविष्याचा वेध; श्राविका शिक्षण संकुलात नव्या विश्वस्तांसह शिक्षकांची सहविचार सभा

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : श्राविका शिक्षण संकुलात भविष्याचा वेध घेण्यासाठी नव्या विश्वस्तांसह सर्व विभागाच्या शिक्षकांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती.  या सभेमध्ये संस्थेचे विश्वस्त यतीन शहा यांनी इतर सर्व विश्वस्तांच्या संमतीने करण शहा आणि देवई शहा यांची श्राविका संस्थेच्या विश्वस्तपदी निवड झाल्याचे  जाहीर केले. सर्व विभागांच्यावतीने श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राखी देशमाने यांनी ओळख करून देताना प्रिसिजन कॅमशाफ्टचे मॅनेजिंग डायरेक्टर तसेच श्राविका संस्थेचे विश्वस्त यतीनन शहा यांच्या कार्याचा गौरव केला, त्यांच्या एकूण कार्यकाळाचा परिचय करून दिला.

यतीन शहा यांनी सर्व शिक्षकांशी संवाद साधला.  त्यांच्या नेतृत्वाखाली श्राविका संस्थेच्या पुढील विकासाचा नवीन आराखडा तयार होणार असल्याचे सांगितले. त्यांनी प्रिसिजनची उभारणी करतेवेळी त्यात आलेल्या अडचणी त्याची ध्येयधोरणे आणि त्यातील शिस्त हे सांगत असतानाच प्रचंड आणि अवाढव्य रूप घेतलेल्या श्राविकासंस्थेला परिवर्तनाची कशी गरज आहे याविषयी कथन केले. हे परिवर्तन करत असताना सर्वांची साथ आणि सर्वांनी ध्येयाने प्रेरित होऊन कार्य करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा सर्व कर्मचारी वर्गाकडून व्यक्त केली.  करण शहा यांनीही आपल्या कारकिर्दीबद्दल सांगत असताना आवश्यक त्या सर्व बदलांमध्ये शिक्षकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.   देवई शहा यांनी संवाद साधताना सदैव सोबत राहून कार्य करूयात असे सांगून सर्वांना आश्वस्त केले.

यानंतर झालेल्या संवादात सर्वांना सहभागी करून घेण्याच्या हेतूने   यतीन शहा यांनी  शिक्षकांना आपले प्रश्न विचार व्यक्त करण्यास सांगितले.यामध्ये उमाबाई श्राविका विद्यालयाचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, चतुराबाई श्राविका विद्यालयाच्या सपनाराणी उपाध्ये आणि उमाबाई श्राविका प्रशालेच्या मार्गदर्शिका दिप्ती शहा यांनी आपले विचार मांडले. यानंतर  पी. एस. इंग्लिश मिडीयम स्कूलचे शिक्षक  क्षीरसागर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact