image source

नोंदणीकृत सहकारी संस्थानी ९ ऑगस्टपर्यंत निविदा सादर कराव्यात

by Kanya News||

सोलापूर :    शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), सोलापूर येथे कंत्राटी सफाईगार पुरविणाऱ्या नोंदणीकृत सहकारी संस्थाकडून निविदा मागविण्यात येत आहेत.तरी इच्छुक नोंदणीकृत सहकारी संस्थांनी आपली निविदा डाक पोच पत्राद्वारे (रजिस्टर ए.डी) /शिघ्र डाक सेवा (स्पीड पोस्ट) “कंत्राटी पदाकरीता निविदा” असे लिफाफ्यावर लिहून प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलींची, १५६/अ रेल्वे लाईन डफरिन चौक, सोलापूर-४१३००१ यांच्या कडे दि. ९ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बंद पाकिटात पाठवावी, असे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एल.के. जाधव यांनी कळविले आहे.

प्राप्त झालेली निविदा किंवा लिफाफा “कंत्राट पदाकरीता निविदा” असे नमूद न केलेली निविदा विचारात घेतली जाणार नाही याची संबधित संस्थेनी नोंद घ्यावी. तसेच पोस्टद्वारे झालेला विलंब विचारात घेतला जाणार नाही. निविदा प्राप्त झाल्यावर दि.१३ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी २ वाजता सदर निविदा उघडण्यात येईल. त्यावेळी आपण किंवा आपला प्रतिनिधी हजर राहू शकेल.

पदाचे नाव- सफाईगार (ठोकवेतन) नियमानुसार, १ पद, अर्हता चौथी किंवा आठवी पास, वयोमर्यादा – १८ पेक्षा कमी व ४५ पेक्षा जास्त वय नसावे, ११ महीने (पुर्ण वेळ) कालावधी असेल. अधिक माहितीसाठी  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलींची, १५६/अ रेल्वे लाईन डफरिन चौक, सोलापूर-४१३००१ येथे संपर्क साधावा असे आवाहनही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एल.के. जाधव यांनी  केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact