शरयू शेळके यांचे सेट परिक्षेत उत्तम यश

By Kanya News||

सोलापूर : घर पती आणि दोन मुलांचा सांभाळ करीत शरयु नवनाथ शेळके या गृहिणीने महाराष्ट्र पात्रता परिक्षा म्हणजेच सेट परीक्षेमध्ये मध्ये घवघवीत यश संपादन केले.
छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज मधील शरयु नवनाथ शेळके भिसे यांनी नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत दि. ७ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता परिक्षा (सेट) मध्ये पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करीत चांगले मार्क्स घेवून उत्तीर्ण झाले.

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ही परिक्षा अत्यावश्यक असल्याने  शरयू शेळके भिसे यांनी अत्यंत मेहनत घेवून या परिक्षेची तयारी केली होती. घर आणि प्रपंच सांभाळत तसेच दोन मुलांचा सांभाळ करीत त्यांनी रात्री उशिरा पर्यत अभ्यास केला त्यामध्ये त्यांचे पती नवनाथ रमेश शेळके यांनी त्यांना मोलाची साथ दिली त्यामुळेच शरयू शेळके या गृहिणीला या सेट परिक्षेत यश मिळाले. त्यांना छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापकांनी मार्गर्शन केले. घर सांभाळून परिक्षेत यश मिळवता येते असा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवल्याने शरयु शेळके यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact