बुधवारी पंढरपुरात बेरोजगारासाठी रोजगार मेळावा

By Kanya News ।।
सोलापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर, गुरूप्रसाद स्कील डेव्हलपमेंट सेंटर, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. ३१ जुलै २०२४ रोजी रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे प्र.सहायक आयुक्त हनमंत नलावडे यांनी दिली.या रोजगार मेळाव्यात दहावी, बारावी पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, जीएनएम, डी.फार्म, एम.एस.डब्लू.बी.सी.एस.बी.सी.ए. या शैक्षणिक पात्रतेची एकूण २ हजार ६९७ पेक्षा जास्त रिक्तपदे सोलापूर आणि पुणे येथील उद्योजकांनी अधिसुचीत केलेली आहेत. मेळाव्यात सोलापूर औद्योगिक परिसरातील १६ नामांकिमत उद्योजक सहभागी होणार आहेत.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी आपल्या कागदपत्रासह बुधवार, दि. ३१ जुलै २०२४ रोजी १० वाजता रयत शिक्षण संस्थचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या (0217-2992956) या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष भेटीद्वारे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधवा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे प्र. सहायक आयुक्त हनमंत नलावडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact