वाढदिनी विद्यार्थिनीने केले वृक्षारोपण: ‘विद्यार्थी जमा बचत बँक’: स्वखर्चाने शाळेला दिली रोपे
By Kanya news ।।
सोलापूर: अक्कलकोट तालुक्यातील हसापूर ज़िल्हा परिषद शाळेतील तिसरीमध्ये शिकणाऱ्या अनन्या निलय्या स्वामी या विद्यार्थिनीने वाढदिवसानिमित्त शाळा परिषदेत वृक्षारोपण केले. अनन्या या विद्यार्थीनीने वृक्षलागवडीचे महत्व ओळखून आपल्या ‘विद्यार्थी जमा बचत बँक’ खर्चातून स्वखर्चाने शाळेला दोन वृक्षांचे रोप भेट देऊन शाळा परिसरात शिक्षकांच्या मदतीने वृक्षारोपण केले. याप्रसंगी वृक्ष भेट स्विकारताना शालेय शिक्षक मधुकर माळी यांच्यासह स्वामी परिवार हसापूर उपस्थित होते.