आस्था सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : आस्था सामाजिक संस्थेच्यावतीने पी.एम. श्री जिल्हा परिषद मुलींची शाळा देगाव येथे गरजू, होतकरू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये वही, पॅड, कंपास, बॅग आदी साहित्यांचा समावेश होता. अध्यक्षस्थानी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी होते. यावेळी संचालक देविदास चेळेकर, योगेश कुंदूर, प्रसिद्धी प्रमुख सुहास छंचुरे, मुख्याध्यापक प्रशांत लंबे, सिद्धू बेऊर उपस्थित होते.
देविदास चेळेकर म्हणाले, आस्था सामाजिक संस्थेचे शैक्षणिक साहित्य वाटपाचे उपक्रम कौतुकास्पद आहे. विद्यार्थिनींनी मोठी स्वप्न उराशी बाळगावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सुहास छंचुरे म्हणाले, सामाजिक बांधिलकी जोपासत हा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवतो. दुसऱ्याला मदत केल्याने आनंद मिळतो. समाधान मिळते. मुलींच्या चेहऱ्याकडे पाहून आनंद झाला. मुलीनो, खूप शिका मोठे व्हा. स्वप्न उराशी बाळगा. शाळेचे नाव लौकिक करा.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक प्रशांत लंबे, शिक्षक वर्ग संगीता कुलकर्णी, वैशाली कोरे, शीतल पाटील, प्रणाली जमादार यांनी परिश्रम घेतले. या शैक्षणिक साहित्यासाठी दानशूर व्यक्ती काशिनाथ राठोड, माऊली तळीखेडे, नगरसेवक विनोद भोसले, समाजसेवक शिवम (भैय्या) सोनकांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन जयश्री मेलगे-पाटील, आभार प्रदर्शन वैशाली कुलकर्णी यांनी केले.