
सोलापूर : अण्णप्पा काडादी हायस्कूलच्या माजी विद्यार्थी मेळाव्यासंदर्भात माहिती देताना माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष उपेंद्र ठाकर.त्यावेळी रद ढोकळे, परशुराम माढेकर, सुनील शेटे, विजय राजपूत, हिदेन्द्र देढिया, वेणुगोपाल शेट्टी, बंडुकांत अनाळकर आदी.
अण्णप्पा काडादी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी केले गणित प्रयोगशाळा विकसित;माजी विद्यार्थी मेळाव्यात शाळेस समर्पित करून फेडणार ऋण
सन १९७४ सालच्या विद्यार्थ्याची पुनश्च भरणार ५० वर्षानी शाळा
By Kanya News ।।
सोलापूर : अण्णाप्पा काडादी हायस्कूलचे सन १९७४ सालच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्याची पुनश्च शाळा भरणार असून, माजी विद्यार्थी मेळावाच्या माध्यमातून ते तब्बल ५० वर्षानी एकत्रित येणार आहेत. अण्णाप्पा काडादी हायस्कूलचे सन १९७४ सालचे माजी विद्यार्थी शुक्रवार, दि. २ ऑगस्ट २०२४ रोजी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा मेळावा भरवणार आहेत.अशी माहिती अण्णप्पा काडादी हायस्कूल माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष उपेंद्र ठाकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सदरचा माजी विद्यार्थी मेळावा हा शुक्रवारी (२ ऑगस्ट २०२४) रोजी सकाळी १०. ३० वाजता अण्णाप्पा काडादी हायस्कूलच्या सप्तर्षी हॉल येथे भरवणार आहेत. सदरच्या मेळाव्यातील उर्वरित कार्यक्रम हे दुपारी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे होणार आहेत. यामध्ये माजी विद्यार्थी ओळख, मनोगत, आठवणी, कविता, विनोद, गाणे, मनोरंजन, स्नेहभोजन आदी कार्यक्रम होणार आहेत.
यावेळी माजी विद्यार्थी मेळावा, गणित प्रयोगशाळा समर्पण, सुवर्णस्मृती स्मरणिकेचे प्रकाशन सोहळा केएलई सोसायटीचे माजी चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शालेय नियामक मंडळाच्या अध्यक्षा सिंधुताई काडादी या उपस्थित राहणार आहेत.
या शाळेचे सन १९७४ सालचे दहावी (जुनी अकरावी) बॅचचे जे विविध ठिकाणी वसलेले आहेत, अशा १०० माजी विद्यार्थ्यांचा सपत्निक सत्कार करण्यात येणार आहे . यापैकी बरचजण आता इंजिनियर, शिक्षक, वकील, चार्टड अकाऊंटंट, व्यावसायिक, लोकप्रतिनिधीदेखील आहेत. यावेळी मुख्याद्यापक अनिल पाटील, संस्थेचे व्यवस्थापन समितीचे सदस्य, आजीवन सदस्य, सचिव, शालेय नियामक मंडळ आदी उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेस माजी विद्यार्थी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष उपेंद्र ठाकूर, सचिव शरद ढोकळे, परशुराम माढेकर, सुनील शेटे, विजय राजपूत, हिदेन्द्र देढिया, वेणुगोपाल शेट्टी, बंडुकांत अनाळकर आदी उपस्थित होते.
-
सुवर्ण महोत्सवीवर्षानिमित्त शाळेच्या ऋणातून अंशतः मुक्त होण्यासाठी एक लहानशी परतफेड म्हणून शाळेत गणित प्रयोगशाळा (maths Lab ) विकसित करून शाळेला समर्पित करणार आहोत. अशी प्रयोगशाळा सोलापूर जिल्ह्यात प्रथमच अत्याधुनिक पद्धतीने म्हणजेच भुमिती, आकृतीचे सर्व प्रकार, लॅपटॉप, प्रोजेक्टर व सर्व लागणारे साहित्य विकसित केलेले आहे. या माजी विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे व स्वेच्छेने भरघोस देणगी देऊन अंदाजे ४.५० लाख (साडेचार लाख) रुपयांची वर्गणी जमा केली आहे. त्यातून ही प्रयोगशाळा विकसित केलेली आहे . यासाठी माजी विद्यार्थी संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर इंडी यांचे सहकार्य लाभत आहे.
-
यापूर्वी या माजी विद्यार्थ्यांनी वाचनालयाची सुधारणा, रुफ टॉप वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम, रसायन प्रयोगशाळेची रॅक, उपकरणे पुरविली आहेत. टीचर्स ट्रेनिंग प्रोग्रॅम, कार्यशाळा, गरजू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना राबवून अर्थसाहाय्य केले आहे.