विद्यार्थ्यांनी प्रशालेला दिला पुस्तक संच, पियानो वाद्य भेट
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : उमाबाई श्राविका विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थी शिक्षक दिन निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थी शिक्षक दिन हा विद्यार्थांसाठी आनंदाचा तर निरोप समारंभ हा भावनात्मक दुःखांचा प्रसंग असा दुहेरी क्षणाचा अनुभव विद्यार्थ्यांनी एकाचवेळी अनुभवला.
स्वागतगीत पल्लवी खांडवे, ऋषभ सोनटक्के, सोनाली उंडे या विद्यार्थीनीनी गायिले. विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्राविका प्रशालेच्या वरिष्ठ मार्गदर्शिका दिप्ती शहा, मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ, विद्यार्थी शिक्षक दिनाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, दहावीचे विद्यार्थी, शिक्षिका, शिक्षकवृंद उपस्थित होते.
मान्यवरांचा विद्यार्थी, शिक्षकांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थी शिक्षक दिनानिमित्त इयत्ता दहावी अ, ब, क या तिन्ही तुकडीतील विद्यार्थी, शिक्षकांनी दिवसभर शाळेचे संचालन करून एक आगळा वेगळा अनुभव घेतला.
वरिष्ठ मार्गदर्शिका दीप्ती शहा म्हणाले, विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार आपले ध्येय निश्चित करावे. त्यासाठी विद्यार्थांनी विविध क्षमता चाचण्या द्यावेत.
मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी माध्यमिक शालांत परीक्षेला सामोरे जाताना कुठल्याही प्रकारचा दडपण घेऊ नये असे सांगून विद्यार्थांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
सहशिक्षिका केतकी सोनटक्के म्हणाले, विद्यार्थ्यांनी पारंपरिक क्षेत्राकडे न वळता करिअरच्या नवनवीन क्षेत्राची निवड करावी. प्रत्येक क्षेत्रात आपला नावलौकिक मिळवावा.
इयत्ता दहावी अ, ब, क या तिन्ही तुकडीतील विद्यार्थ्यांनी प्रशालेस वाचनीय पुस्तकाचा संच व पियानो वाद्य भेट दिली. कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता नववी “अ”च्या विद्यार्थ्यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी शिक्षक झालेल्यांचे निरीक्षण महाडिक, उपाध्ये, पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अनुष्का केत, आभार प्रदर्शन धनश्री होणपारखे यांनी केले.
याप्रसंगी कलाशिक्षक प्रविण कंदले यांनी अप्रतिम असे फलक लेखन केले. दहावीच्या वर्ग शिक्षिका केतकी सोनटक्के, सोनल आळंद, मिनाक्षी बेळ्ळे, सुकुमार वारे, राजकुमार देवकाते, अनुप कस्तुरे, सुहास छंचुरे, अभिनंदन उपाध्ये, वैभव बारडकर, प्रविण शहा, अनंत बेळ्ळे, अभिजित पाटील प्रसन्न गाडे यांनी परिश्रम घेतले.