आस्था सामाजिक संस्थेतर्फे मूकबधीर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
By Kanya News||
सोलापूर : आस्था सामाजिक संस्था ( आस्था रोटी बँक) व नागेश करजगी युथ फाउंडेशनच्यावतीने मूकबधीर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले . मल्लिकार्जुन अक्कलकोट नगर येथील प्रगती मूकबधीर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ५० विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, कंपास पेटी, वह्या, पॅड,पेन इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी होते . यावेळी सदस्य योगेश कुंदुर, प्रसिद्धी प्रमुख सुहास छंचुरे, शुभम भडाळे, संस्थापक माधव देवकर, सचिव विलास देवकर, मुख्याध्यापक चंद्रकांत कदम उपस्थित होते .
यावेळी अध्यक्ष आनंद तालिकोटी यांनी आस्था रोटी बँकेने आजपर्यंत सामाजिक, कार्यात केलेल्या योगदानाचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन सारिका देवदारे, आभार प्रदर्शन दिपाली रेड्डी यांनी केले. यासाठी दानशूर व्यक्ती माजी नगरसेवक बाबुभाई मेहता, प्रशिक सामाजिक संस्थेचे सल्लागार शिवम सोनकांबळे यांचे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आस्था सामाजिक संस्थेचे सचिव शिवानंद सावळगी, उपाध्यक्ष चंद्रकांत शहा, सदस्य डॉ. महावीर शास्त्री,अनिल जमगे सोमनाथ कोळेकर, प्रदीप ढेरे यांचे सहकार्य लाभले.