मनीष गडदे

शंभर टक्के फी माफीसाठी ‘नवीन शासन निर्णय’ जीआर काढा

मनीश गडदे यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

By Kanya News

 सोलापूर : महाराष्ट्रातील शंभर टक्के फी माफीची अत्यंत चांगल्या योजनेच्या शंभर टक्के अंलबजावणी होऊन यशस्वी होण्यासाठी शासनाने कठोर भूमिका स्वीकारून या योजनेतील अडथळे दूर करावीत. शंभर टक्के फी माफीला ‘पात्र’ विद्यार्थिनी, पालकांकडून सक्तीने शैक्षणिक फी वसुली करणार्या संस्थाचालकांवर अटक व फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाईचा “नवीन शासन निर्णय” जीआर  काढावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सेक्रेटरी अॅड. मनीश गडदे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मनीष गडदे

विद्यार्थी व पालकांची पिळवणूक, लुबाडणूक नेमकी याचवेळी होत आहे. अत्यंत जीवघेण्या स्पर्धेतून मिळालेले ऍडमिशन रद्द होईल या भीतीने विद्यार्थी पालक अगदी हतबल होऊन राहते घर, शेतजमीन, दागदागिने विकून अथवा घाण ठेवून किंवा सावकारी 10 ते 20 टक्क्यांनी कर्ज काढून ही जबरदस्तीची फी भरून कंगाल होत आहेत. यात शेकडो कुटुंब उध्वस्त झाली आहेत, विद्यार्थी व पालक गरिबीला कंटाळलेले असून, त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact