लॉन टेनिस अजिंक्यपद स्पर्धा

कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. २९ ऑगस्ट २०२१-

सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेच्या वतीने दि. २९ ऑगस्ट २०२१ रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित केलेल्या जिल्हा लॉन टेनिस अजिंक्य स्पर्धेत जय गायकवाड, प्रसन्न पांडेकर, स्वरांजली नराळे आणि गिरीजा कुलकर्णी यांनी विविध वयोगटातून विजेतेपद पटकावले आहे. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात स्वरांजली नराळेने रिया गांधीचा अत्यंत अटीतटीच्या सामन्यात ६-४ ने पराभव केला. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात जय गायकवाडने ऋशंक गायकवाडचा ६-३ असा पराभव करून अजिंक्यपद पटकावले .
१७ वर्षे मुलींच्या गटात गिरीजा कुलकर्णीने शर्वरी कुलकर्णी हीचा ६-१ ने तर १७ वर्षे मुलांच्या गटात प्रसन्न पांडेकरने रोहित पुट्टाचा ६-३ ने पराभव केला.
या स्पर्धा इनर व्हील क्लब ऑफ सोलापूर स्टॅरलेट ने पुरस्कृत केल्या होत्या . स्पर्धेत एकूण ७३ खेळाडूंचा सहभाग होता . स्पर्धेतील विजेत्या व उप विजेत्यांना स्मिता चाकोते , मोनिका आळंद यांच्या हस्ते चषक व प्रमाणात देऊन गौरविण्यात आले .
स्पर्धेतील विजेते व उपविजेते राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत .
या प्रसंगी तुकाराम गायकवाड, डॉ. बकुल जहागीरदार , सिद्धार्थ गांधी, माया खंडी, डॉ.प्रणित नराळे आदी उपस्थित होते . सूत्रसंचालन राजीव देसाई यांनी केले .

जिल्हा लॉन टेनिस अजिंक्य स्पर्धेच्या बक्षिस वितरणप्रसंगी विजेत्या व उपविजेत्यांसमवेत डावीकडून मोनिका आळंद , स्मिता चाकोते , माया खंडी , राजीव देसाई आदी.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *