कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. २३ ऑक्टोबर २०२१-

ओकीनावा मार्शल आर्ट्स असोसिएशन ऑफ सोलापूर यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत गांधी नाथा रंगजी विद्यालयाच्या खेळांडूंनी यश संपादन केले आहे.
यामध्ये साक्षी जिडगे हिने अ गट काता प्रकारात सुवर्ण पदक व वेपन काता प्रकारात कांस्य पदक पटकवले. समृद्धी बरडे हिने फाईट व काता या दोन्हीत सुवर्ण पदक तर ग्रुप काता प्रकारात रौप्य पदक मिळविले. पंकज पंडित याने ग्रुप काता प्रकारात कांस्य पदक पटकावले.
या यशाबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष संजय गांधी, मुख्याध्यापिका स्मिता पुरवत, सुनंदा बुधनेर यांनी कौतुक केले आहे. या खेळाडूंना क्रीडाशिक्षक शिवानंद सुतार यांचे मार्गदर्शन लाभले.

ओकीनावा मार्शल आर्ट्स असोसिएशन ऑफ सोलापूर यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत गांधी नाथा रंगजी विद्यालयाच्या खेळांडूंनी यश संपादन केले आहे.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *