वंचित, उपेक्षित शेतकऱयांसाठी डाळिंब केंद्राचा कायम पुढाकार : केंद्र संचालक राजीव मराठे यांचे मत
-शेतकऱयांना कृषीनिविष्ठांचे वाटप;

विश्वकर्मा सोशल फाउंडेशनचे साह्य
By Kanya News
सोलापूर : वंचित, उपेक्षित प्रवर्गातील शेतकऱयांच्या प्रगतीसाठी डाळिंब संशोधन केंद्र कायम पुढाकार घेत आले आहे, यापुढेही तो घेऊ, असे मत राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे केंद्र संचालक डॉ.राजीव मराठे यांनी कारंबा (ता.उत्तर सोलापूर) येथे केले.
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्यावतीने अनुसुचित जाती प्रवर्गातील शेतकऱयांसाठी मोफत विविध प्रकारच्या कृषीनिविष्ठांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. विश्वकर्मा सोशल फाउंडेशनच्या साह्याने हा उपक्रम घेण्यात आला. डाळिंब संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॅा. संग्राम धुमाळ, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॅा. शिल्पा परशुरामी, शास्त्रज्ञ रुपा सौजन्य, विश्वकर्मा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक सुतार, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी दडे, सोसायटीचे सदस्य भागवत कत्ते, संजय आदाटे, कृषी सहायक ज्ञानदेव गोडसे, शरीफ शेख, ग्रामपंचायत सदस्य कमल पाटील, कैलास कांबळे, सुहास भोसले, अनिल सुतार, अमोल सुतार, बाळासाहेब माने, सत्तार शेख, सुखदेव कांबळे, ज्ञानेश्वर कांबळे, राजू कदम, शिवशंकर नारायणकर आदी उपस्थित होते.
मराठे म्हणाले, डाळिंब केंद्राचे कार्यक्षेत्र देशभर आहे. डाळिंबाच्या लागवडीपासून व्यवस्थापनापर्यंत सर्वप्रकारचे तांत्रिक मार्गदर्शन आम्ही करतो, जिल्ह्यासह स्थानिक भागातील शेतकऱयांनी कधीही आमच्याकडे यावे, आम्ही वेगवेगळ्या भागात असे उपक्रम राबवतो, पंतप्रधान मोदी यांनी जाणीवपूर्वक या वर्गातील शेतकऱयांसाठी हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला, आम्ही त्याची अंमलबजावणी करतो आहोत, असे ते म्हणाले. प्रास्ताविक विश्वकर्मा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक सुतार यांनी केले. त्यांनी फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास भोसले यांनी केले. बाळासाहेब माने यांनी आभार मानले.
उत्तर सोलापुरातील आठ गावात वाटप
या कार्यक्रमात कारंबा, साखरेवाडी, अकोलेकाटी, गुळवंची, खेड, बीबीदाऱफळ, नान्नज, राळेरास या गावातील अनुसूचित जाती प्रवर्गातील ४० शेतकऱयांना प्रत्येकी सुमारे १५ हजार रुपये किंमतीच्या कृषीनिविष्ठांचे मोफत वाटप करण्यात आले. त्यात सेंद्रिय तसेच रासायनिक खते, किटकनाशक-बुरशीनाशक, संजीवके, शैवाल खते या कृषीनिविष्ठांसह कामगंध सापळ्यांचा समावेश आहे.