वीरशैव माता-भगिनी “वेदवाणी” गौरव पुरस्काराने सन्मानित

सामूहिक श्रीरूद्र पठण, कुंकुमार्चन सोहळ्यात ५०० वीरशैव भगिनींचा सहभाग; वीरशैव लिंगायत जंगम संस्कार केंद्राचा उपक्रम

By Kanya News ।।
सोलापूर: सनातन हिंदू वीरशैव अध्यात्मिक संस्कार केंद्र आणि श्री वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ, सोलापूरच्यावतीने वीरशैव लिंगायत जंगम संस्कार केंद्र, श्रीरामनगर, जुळे सोलापूर येथे आयोजित सामूहिक श्रीरूद्र पठण, कुंकुमार्चन सोहळ्यात ५०० वीरशैव भगिनींनी सहभाग नोंदवला. ज्ञान सिंहासनाधिश्वर १००८ काशी जगद्गुरु डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या इष्टलिंग महापुजा प्रसंगी महिला मंडळींच्यावतीने सामूहिक श्रीरूद्र पठण आणि कुंकुमार्चन करण्यात आले.


वीस ते पन्नास वर्षापासून वीरशैव लिंगायत समाजातील माता भगिनींना श्रीरूद्र अध्याय, सिध्दांत शिखामणी पारायण, शिवयोगी श्री सिद्धारामेश्वर पारायण अध्याय ज्ञान देवून हिंदू वीरशैव अध्यात्मिक संस्काराचे मार्गदर्शन करण्यात आले. सर्वांना सोबत घेऊन धार्मिक कार्यात भक्तीने सहभाग होऊन सनातन हिंदू अध्यात्मिक संस्काराचे उत्कृष्ट कार्य असलेले कार्य लक्षात घेऊन श्री काशी जगद्गुरु जगद्गुरूंच्या अमृत हस्ते सोलापुरातील विविध भागातील माता भगिनींना “वेदवाणी” गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
सनातन हिंदू संस्कार अभ्यासक, पुणे शरद बबनराव गंजिवाले आणि हिंदू वीरशैव लिंगायत अधिवक्ता (वकील) आघाडीचे प्रमुख ऍड. वैजनाथ विंचूरकर आदींच्या उपस्थितीत सनातन हिंदू वीरशैव अध्यात्मिक संस्कार केंद्र प्रमुख वे. ईश्वर स्वामी-होळीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.

यावेळी सभेत काशी पिठाचे श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, काशीपीठ यांनी श्री वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ आणि सनातन हिंदू वीरशैव अध्यात्मिक संस्कार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुढील काशी पिठाचे नूतन जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरमध्ये होम मैदान येथे एक लाख महिलांचे रुद्र पठाण व्हावे अशी इच्छा व्यक्त केली.

  • यावेळी वीरशैव समाजातील लता विजयकुमार तालिकोटी (श्री जयमाता रूद्र महिला मंडळ, बाळीवेस), इंदुमती विजयकुमार बसवंती (वीरशैव रूद्र मंडळ,सम्राट चौक), शैला वैजिनाथ मुंढे (वीरशैव स्त्री सदाचार मंडळ, उत्तर कसबा), पार्वती शिवानंद कारंजे (रेणुकाचार्य रूद्र मंडळ, कुंभारी), शैलजा गौरीशंकर वाले (चन्नवीर रूद्र मंडळ, उत्तर कसबा), विद्या रमेश मणुरे (वीरशैव रूद्र मंडळ,कर्णिक नगर), राजश्री प्रकाश गोटे (ओंकारेश्वर रूद्र मंडळ,जानकी नगर, जुळे सोलापूर), जगदेवी अवधूत म्हमाणे (शिव साधना रूद्र मंडळ सुंदरम नगर, विजयपूर रोड), शारदा चंद्रशेखर चांगले (श्री कामेश्वर रूद्र मंडळ, तुळजापूर वेस), निर्मला प्रकाश कोनापुरे (श्री स्वामी समर्थ रूद्र मंडळ, महादेव गल्ली), ज्योती श्रीशैलप्पा शिरसी (श्री जयमाता रूद्र मंडळ, बाळीवेस), रूपा स्वामी (श्री समाधान रूद्र मंडळ), इंदूमती बाबुराव ढंगे (शिवयोग धाम शेळगी) या सोलापुरातील विविध भागातील माता भगिनींना “वेदवाणी” गौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात आले.

श्री वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळचे संस्थापक डॉ. शिवयोगी शास्त्री-होळीमठ, अध्यक्ष बसवराज शास्त्री-पुराणिक, उपाध्यक्ष कल्लय्या शास्त्री गणेचारी, व्याख्यान केसरी बसवराज शास्त्री हिरेमठ, राजशेखर स्वामी, महेश बेंबळगी, योगेश होळीमठ, कार्तिक स्वामी, संगय्या स्वामी उपास्थित होते. पुरस्कार सोहळ्याचे आयोजन श्री सनातन हिंदू विरशैव अध्यात्मिक संस्कार केंद्राचे प्रमुख ईश्वर स्वामी-होळीमठ यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शोभा कराळे, प्रास्ताविक राजश्री गोटे यांनी केले. मनोगत शरद गंजिवाले, शैलजा वाले आणि आभार प्रदर्शन संस्कार केंद्र प्रमुख वे. ईश्वर स्वामी-होळीमठ यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजशेखर कोले, शरद गंजिवाले (पुणे), सतीश शेंडे, महेश गाढवे, नितीन कुर्ले, कल्याणी मंठाळे यांच्यासह अन्य संस्कार केंद्र सदस्यानी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact