
व्ही. जी. शिवदारे कॉलेजची शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी;
राजशेखर शिवदारे यांच्या नेतृत्वांखाली संस्थेची प्रगतीच्या दिशेने वाटचाल
By Kanya News||
सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण गंडळ संचलित व्ही. जी. शिवदारे कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स अन्ड सायन्स, सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाची स्थापना कै. वि. यु. शिवदारे अण्णा व त्यांचे वि गी श्र व सहकारी कै. शिवलिंग अण्णा दुधनी यांनी १९७६ साली केली. फार्मसी व बायोटेक्नॉलॉजी यासारख्या नविन अभ्यासक्रमांची सोलापूर जिल्ह्यात मुहूर्तमेढ रोवण्याचा मान या संस्थेस मिळाला आहे, याचा आनंद होत आहे. यंदाच्या वर्षापासून व्ही. जी. शिवदारे कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स अन्ड सायन्स कॉलेजमध्ये बी-कॉम भाग-१ (आयटी) या नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. डी. एस. सुत्रावे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अण्णानंतर विद्यमान अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. आज रोजी संस्थेत फार्मसी पदविका ते पदव्युत्तर, आर्टस, कॉमर्स आणि ब्यायोटेक्नॉलॉजी तसेच नर्सरी ते बारावीपर्यंतचे शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध आहे. फार्मसी| मडाविद्यालयास ब प्लस (बी++) व शिवदारे मढाविद्यालयास ए ग्रेड नाक (ए ग्रेड एनएएसी) मूल्यांकन मिळाला आहे.
अलीकडील काळामध्ये तंत्रज्ञानामधील प्रगतीमुळे वाणिज्य शाखेमध्ये आयटी व्यावसायिकांची मागणी वाढली आढे. ऑनलाईन बँकिंग व्यवसाय, ऑनलाईन स्टॉक ट्रेडिंग, शेअर मार्केट, ऑनलाईन शॉपिंग अशा अनेक कारणांमुळे वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रात करिअर करण्याची अनोखी संधी निर्माण झाली आहे. आय.टी. क्षेत्रामधील विविध प्रकारची कौशल्ये जसे की प्रोग्रॅमिंग, डेटा विष्लेषण, प्रकल्प व्यवस्थापन, प्रोग्रॅमिंग डिझाइन, व्यवसाय विष्लेषण, डेटा विष्लेषण आणि प्रकल्पाशी संबंधित भूमिकांचा समावेश असलेला अभ्यासक्रम आहे. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यानुसार तसेच आवडींना अनुसरून करिअरचा मार्ग शोधून देते.
कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना आय.टी. जॉबची संधी –बर्याच आयटी नोकऱ्यांसाठी विप्लेषणात्मक कौशल्ये असलेल्या व्यावसायिकांची आवश्यकता असते. ज्यासाठी अनेक आयटी आणि उत्पादन कंपन्या वाणिज्य पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांचा सक्रियपणे शोध घेतात. कॉमर्सच्या विद्यार्थांसाठी अशी आयटी नोकर्यांची माहिती खालील प्रमाणे:
1) व्यवसाय विश्लेषक ( बिझनेस अनालिस्ट) : प्राप्त डेटाचा पूर्ण उपयोग व्यवसाय विश्लेषक व्यवसाय निर्णयांना चालना देण्यासाठी करतात. बीकॉम (आयटी) या शाखेमध्ये व्यवसाय व डेटा विष्लेषण कौशल्य एकत्रित केल्याने या शाखेतील विध्यार्थ्यांना संधी उपलब्ध होतील.
2) फ्रंट- एंड अभियंता (फ्रंट एंड इंजिनिअर) : व्यवसायिक वापरकर्ता आणि हार्डवेअर डिव्हाइस, सॉफ्टवेअर प्रोग्रॅम यांच्यातील . परस्परसंवाद वर्तनाचा प्रोटोकॉल परिभाषित करण्यासाठी बीकॉम आयटी या शाखेतील विद्यार्थ्यांनासंधी उपलब्ध आहेत.
3) वेब निर्माता (वेब प्रोडुसर) : या भुमिकेसाठी तांत्रिक आणि संप्रेषण कौशल्ये यांची जोड आवश्यक आहे, ज्यामुळे बीकॉम (आयटी) या शाखेतील विद्यार्थ्यांना ज्ञात असलेल्या पायथन, एसक्यूएरल आणि आर सारख्या प्रोग्रॅमिंग भाषांमधील प्रवीणता उपयोगी येते.
4) आयटी मॅनेजर: व्यवसाय प्रक्रियेची समज असलेले आणि तंत्रज्ञानाची आवड असलेले वाणिज्य विद्यार्थी एखाद्या संस्थेमध्ये तंत्रज्ञान अखंडपणे कार्य करते हे सुनिश्चित करण्यात आयटी व्यवस्थापक म्हणून भूमिका बजावू शकतात. आयटी पायाभूत सुविधांवर देखरेख, संघ व्यवस्थापन आणि, व्यवसायन ऑपरेशनला समर्थन अश्या महत्वाच्या जबाबदार्या पार पाडू शकतात.
5) यूएक्स डिझाईनर: बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये रोजगार संधी उपलब्ध आहेत. ग्राहकांना सुरळीत खरेदीचा अनुभव मिळावा याची खात्री करून देण्यात महत्त्वाची भूमिका ते बजावतात.
6) बीकॉम आयटीमधील इतर करिअर संधी : एलआयसी, हेल्थ इन्शुरन्स सल्लागार, डिजिटल मार्केटिंग, आंतरराष्ट्रीय व्यापार, काऊंन्सलर, सर्वेक्षण, ग्राफिक अनेलिसिस उद्योगमधील ऑडिट्स, व्यवस्थापन कौशल्य क्षेत्रात केल्यामुळे नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. सदर बीकॉम आयटी कोर्सला प्रवेश घेण्यासाठी कोणत्याठी शाखेतील (आर्टस् , कॉमर्स, सायन्स ) किमान बारा वी उत्तीर्ण असणे आव्यक आहे. महाराष्ट्र बोर्ड ऑफ हायर सेकंडरी एज्यूकेशन धिस एक्वावॅलंट वर एनी डिप्लोमा ऑफ मेव ऑफ नॉट लेस द्यान टू इयर्स. बीकॉम आयटी कोर्स किमान ३ वर्षाचा आहे .बीकॉम आयटी कोर्स पूर्णत: इंग्लिश मेडीयम आहे.
- महाविद्यालयाची ठळक वैशिष्टये –
० प्रशस्त इमारत व हरीत संकुल
० सुसज्ज ग्रंथालय सुविधा
० अद्यावत कॉम्प्युटर लॅबची सुविधा.
० प्लेसमेंटची सुविधा
० तज्ञ प्राध्यापक वर्ग
० विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप, सेमिनार, चर्चासत्र, फिल्ड व्हिजिटचे आयोजन.
-डॉ. डी. एस. सुत्रावे, प्राचार्य, व्ही. जी. शिवदारे कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स अन्ड सायन्स कॉलेज सोलापूर .
(८३२९०९८३८४). ऑफिस – ०२१७-२३०३४११. वेळ – सकाळी – १० ते ७. पत्ता – जुळे सोलापूर-१ बायोटेक्नॉलॉजी – फार्मसी कॅम्पस, विजयपूर रोड, सोलापूर. ई-मेल : vgs.botechnology. rediffmail.com. वेबसाईट : www. vgcollege. com.