उद्योजक सिद्धू रेड्डी कंदकटला : शैक्षणिक साहित्य वाटप
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : मोहोळ येथील सौ. सरस्वती लक्ष्मण काळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सूद चॅरिटी फाउंडेशन वैष्णवी इंग्लिश मॉडेल स्कूलसाठी ५१ बेंचेससह प्रोजेक्टर देणार असल्याची ग्वाही हैदराबाद-तेलंगणा येथील सुप्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सिद्धू रेड्डी कंदकटला यांनी दिली. सिद्धू रेड्डी कंदकटला हे अभिनेता इंद्रसेना बुद्धम यांच्यासह शाळेला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी त्यांचे शाळेमध्ये आगमन होताच लंबोदर ढोल,ताशा, पथक सोलापूर येथील सर्व मुलांनी त्यांचे स्वागत ढोल ताशाच्या गजरात केले. सिद्धू रेड्डी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे हार घालून स्वागत सूद चॅरिटी फाउंडेशनचे मेंबर विपुल मिरजकर, वैष्णवी इंग्लिश मॉडेल स्कूलचे सचिव विशाल काळे, अध्यक्ष आदिनाथ काळे यांनी केले. सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले. पाहुण्यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सिद्धू रेड्डी यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
विश्वविक्रमवीर, सोनू चॅरिटी क्लबचे सदस्य व चित्रकार विपुल मिरजकर यांनी साकारलेल्या कलाकृतीचा उद्घाटन सोहळा पार पडला. आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव विशाल काळे यांनी केले. त्यानंतर रेड्डी यांनी विपुल मिरजकर यांच्या निवास्थानी जाऊन त्यांच्या मातोश्री आणि कुटुंबियांची भेट घेतली. विपुल यांच्या कलेचे कौतुकही केले. त्यांच्या आईचे आशीर्वाद घेऊन ते तेलंगणासाठी रवाना झाले.