दारफळ (गा.) येथे कृषी कन्यांमार्फत (पशू) जनावरांचे लसीकरण करण्यात आले.

दारफळ (गा.) येथे २७४ पशूना लसीकरण

By Kanya News

सोलापूर: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महावि

दारफळ (गा.) येथे कृषी कन्यांमार्फत (पशू) जनावरांचे लसीकरण करण्यात आले.

द्यालय, वडाळा यांच्यावतीने आयोजित दारफळ (गा.) येथे कृषी सप्ताह अंतर्गत  कृषी कन्यांमार्फत (पशू) जनावरांचे लसीकरण करण्यात आले.

यावेळी पशुधन पर्यवेक्षक डॉ. जीवन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संतोष साठे, डॉ. बाळासाहेब कशीद, डॉ. नानासाहेब पवार, डॉ. वैभव माने यांनी जनावरांचे लसीकरण केले. यावेळी गावामध्ये जनावरे एकत्र जमा न करता प्रत्येकाच्या गोठ्यात जाऊन लसीकरण करण्यात आले. संसर्गाचे धोका लक्षात घेऊन ही उपाययोजना करण्यात आली. यावेळी एकूण 274 जनावरांचे लसीकरण करण्यात आले. गायींना आणि म्हशींना घटसर्प या रोगावरील लस देण्यात आली.

शेळ्यांना ईटीएस लस देण्यात आले.यावेळी कृषीकन्या  अंजली होटकर, अमृता माळी,  हर्षदा निगडे, वैष्णवी शिंदे सगुणा  सुरवसे, प्रियंका शिंदे यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन फुगे, प्रा. गणेश जाधव, प्रा. स्वप्निल कदम, प्रा.ज्योती गायकवाड आदींचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact