वीरशैव लिंगायत समाजाचा उदगीर येथे वधू-वर परिचय मेळावा
By Kanya News|
उदगीर : लिंगायत महासंघाच्या उदगीर शाखेच्यावतीने लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शनराव बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर येथील रघुकूल मंगल कार्यालयात रविवार’दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी दहा वाजता वीरशैव लिंगायत समाजाचा वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या वधू-वर मेळाव्यात सहभागी होण्यासाठी वधू-वरांनी व त्यांच्या पालक, नातेवाईकांनी मेळाव्यापूर्वी व मेळाव्या दिवशी उमेदवाराचे नाव नोंदवणे आवश्यक आहे. नाव नोंदवित असताना उमेदवाराची संपूर्ण माहिती पत्ता व मोबाईल नंबर आणि दोन पासपोर्ट फोटो देणे आवश्यक आहे. तसेच नाव नोंदणी शुल्क पाचशे एक (५०१/-) रुपये असून, वधू वर मेळावा संपल्यानंतर एक ते दीड महिण्यानंतर या वधू-वर मेळाव्यात नाव नोंदणी करणाऱ्यांची व मेळाव्यात हजर असणा-या उमेदवारांची माहिती पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे. ज्यांची नाव नोंदणी झाली आहे, त्यांना हे पुस्तक मोफत देण्यात येणार आहे. ज्यांना नाव नोंदवणे शक्य झाले नाही. तसेच मेळाव्यालाही उपस्थित राहणे शक्य झाले नाही, अशा गरजुंना हे पुस्तक पाचशे एक ५०१/रुपये देऊन विकत घेता येऊ शकते. पुस्तक घरपोच हवे असल्यास१००/ पोस्टेज खर्च वेगळा द्यावा लागेल.
वधू-वर मेळाव्यात नाव नोंदणी करण्यासाठी लिंगायत महासंघाचे वधू वर लिंगायत महासंघाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत सिरसे यांचे सिरसे अक्वा आडत लाईन उदगीर येथे संपर्क साधावा. इच्छूक उमेदवारांनी (९८९००९९७९२) या नंबरवर गुगल पे किंवा फोन पे करून नाव नोंदणी शुल्क भरावेत, असे आवाहन लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत काला पाटील (९७६७८०६९५१) जिल्हा उपाध्यक्ष बसवराज ब्याळे (९८५०६४०६०७), तालुकाध्यक्ष चंद्रकांत सिरसे (९८५०२४७१५७), शहराध्यक्ष भिमाशंकर शेळके (९७६४२३२१८६), राजकुमार वडले (८३०८७५३७२०), संजय शिवशेट्टे (९४२१३४२५८८), बापुराव शेटकार (९३७३६०७०३०), प्रा. प्रकाश करेप्पा (९४२१३४१५६), महेश धोंडिहिप्परगेकर, (७९७२७७३२३२) अशोक कडोळे (८००७५०८१२३),लक्ष्मण रोडगे (९५४५३६३८३४) यांनी केले आहे.