उदगीर येथील साहित्य संमेलनात हजार पत्रकारांची उपस्थिती लाभणार
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : उदगीर येथे रविवार, दि. २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय पत्रकार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सोलापूर येथील आहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे वृतपत्र माजी विभाग प्रमुख, ज्येष्ठ पत्रकार डॉ. रविंद्र चिंचोलकर यांची निवड झाली आहे.
उदगीर येथील रंगकर्णी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठानच्यावतीने हे राज्यस्तरीय संमेलन आयोजित करण्यात आले आहे .या संमेलनाचे उद्घाटक म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री यांची निवड करण्यात आल्याची माहिती संयोजक समितीचे अध्यक्ष विभीषण मद्देवाड यांनी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
पहिल्या राज्यस्तरीय पत्रकार साहित्य संमेलनाचे आयोजन रविवार, दि. २० ऑक्टोबर रोजी उदगीर शहरातील रघुकुल मंगल कार्यालयात करण्यात आले आहे. या दिवशी रविवार, दि. २० रोजी सकाळी ८.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सविधान दिंडीने संमेलनाची सुरुवात होणार आहे. याचे संमेलनाचे उद्घाटन १०.३० वाजता मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. संमेलन अध्यक्ष म्हणून डॉ. रवींद्र चिंचोलकर, तर स्वागताध्यक्षपदी ना. संजय बनसोडे उपस्थित राहणार आहेत. या संमेलनानात परिसंवाद, न्युसलेस कवितेची काव्यमैफील, कविसंम्मेलन, राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार आणि समारोप असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
या संमेलनासाठी संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या संमेलनाची जय्यत तयारी करण्यात येत असून, या संमेलनासाठी राज्यभरातून जवळपास १००० पत्रकार उपस्थित राहतील, अशी अपेक्षा संयोजन समितीचे अध्यक्ष मद्देवाड यांनी व्यक्त केली आहे.