By Kanya News
सोलापूर : लिंगायत महासंघाच्यावतीने अहिल्यादेवी होळकर गार्डन शाहू चौक, उदगीर येथे आयोजित लिंगायत समाजातील गुणवंतांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगीचे छायाचित्र.
उदगीर : लिंगायत समाजातील सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवावी, असे मत लिंगायत महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुदर्शनराव बिरादार यांनी केले. ते लिंगायत महासंघाच्यावतीने अहिल्यादेवी होळकर गार्डन शाहू चौक, उदगीर येथे आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते.लिंगायत महासंघाच्यावतीने समाजातील ६० गुणवंत विद्यार्थ्यांसह पालकांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी शि. भ.प.शिवराज नावंदे गुरूजी, लिंगायत महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष बसवराज ब्याळे, शिवकुमार पाटील, दिलीप सांगावे, चंद्रकांत कोरे, शिवकुमार हसरगुंडे, रमेश अंबरखाने, पोलिस निरीक्षक सोनकवडे, विश्वनाथ मुडपे गुरुजी आदींची यावेळी समोयोचित भाषणे झाली. यावेळी लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत काला-पाटील, तालुकाध्यक्ष चंद्रकांत सिरसे, लक्ष्मण रोडगे,अशोक कडोळे, रामेश्वर गोगे, शहराध्यक्ष भिमाशंकर शेळके, सुभाष शंकरे, बसवराज काला, भरत करेप्पा, बिरादार, मुख्याध्यापिका स्वामी, मुरलीधर जाधव, दिलीप बलसुरकर, राम चांमले, संजय शिवशेट्टे यांच्यासह अनेक मान्यवर व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यासाठी भिमाशंकर शेळके, लक्ष्मण रोडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रा. सुदर्शनराव बिरादार म्हणाले, शिक्षण व नोकरीत खूप स्पर्धा सुरू आहे. मुलांबरोबर आई वडिलांची सुद्धा परिक्षा असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.लिंगायत मुलांना आरक्षण नसल्याने परिक्षेत जास्त मार्क्स घेऊन मेडिकल, इंजिनिअरिंगला प्रवेश मिळत नाही. प्रवेश मिळाला तर महागड्या शिक्षणाचा खर्च परवडत नाही. लिंगायत समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही खूप प्रयत्न करीत आहोत.
By Kanya News सोलापूर : लिंगायत महासंघाच्यावतीने अहिल्यादेवी होळकर गार्डन शाहू चौक, उदगीर येथे आयोजित लिंगायत समाजातील गुणवंतांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगीचे छायाचित्र.