‘स्पिरिचुअल माझस्ट्रो’ संस्थेचा उपक्रम 

By Kanya News||

सोलापूर : “ स्पिरिचुअल माइस्ट्रो” या कंसल्टिंग व ट्रेनिंग संस्थाची अंकशास्त्र, टैरो कार्ड या विषयाची दोन दिवशीय कार्यशाळा शुक्रवार, दि. १० ऑगस्ट व शनिवार दि. ११ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती “ स्पिरिचुअल माइस्ट्रो” या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक, ज्योतिषरत्न, वास्तुशास्त्राचार्य डॉ. जयेश राणावत यांनी पत्रकार परिषदेत दिली. टैरो कार्डसंबंधी माफक दरात योग्य मागर्दर्शन, सल्ला-मसलत देण्यात येणार आहे.

सदरची दोन दिवसीय कार्यशाळा  शनिवारी (दि. ११ ऑगस्ट) रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत श्री भोज  एस. टी. स्टैन्डचा समोरील क्रोमा शोरूमच्यावर आयोजित करण्यात आली आहे.

डॉ. जयेश रामावत यांना वास्तुचा १८ वर्षांचा व अंक शास्त्रांचा ६ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी *स्पिरिचुअल माइस्ट्रो’ या कंसल्टिंग व ट्रेनिंग संस्थाची दोन वर्षापूर्वी सुरुवात केली होती. या संस्थेच्यावतीने  शास्त्रीय, वैज्ञानिक पद्धतीने सर्व प्रकारचे वास्तू दोष आणि त्या वास्तूवास्तुचे उपाययोजनेद्वारे निराकरण केले जाते.  तसेच अंकशास्त्र  देखील शिकवले जाते.  लोकांना अंकशास्त्र, टैरो कार्ड  या विषयाची आवड निर्माण व्हावी, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले असून,   या दोन विषयाचा प्राथमिक  ज्ञान देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.

सोलापूरचे प्रसिद्ध  वास्तू, अंक शास्त्री व ऑरा ऐनलिस्ट, डॉ. जयेश रामावत आणि मुंबईची प्रसिध्द टैरो मास्टर व रैकी ग्रैंड मास्टर डॉ. रेखा गोसावी है दोघे या कार्यशाळेत प्रशिक्षण (ट्रेनिंग) देणार आहोत याचठिकाणी सायंकाळी ६ ते ८ यावेळेत वास्तू, ज्योतिष, अंकशास्त्र, टैरो कार्डविषयी योग्य मार्गदर्शन, सल्ला-मसलत माफक दरात केले जाणार आहे. या कार्यशाळेसाठी त्वरित रजिस्ट्रेशन करून आपली जागा सुनिश्वीत करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

===========================

अंकशास्त्रामध्ये हे शिकवणार :

  • अंकशास्त्र काय आहे.
  • विविध अंकांचे कॅल्क्युलेशन.
  • लोशु चार्ट बनवण्याची व बघण्याची पद्धती.
  • किती प्रकारचे योग असतात.
  • रिपीट व मिसिंग अंकांचे परिणाम.
  • अंकाशास्त्रामध्ये नावाचे महत्व.
  • मोबाईल नंबर, घर नंबर, वाहन नंबर आदी कसे कॅल्क्युलेट करायचे.
  • उपाय.
  • साधारण वास्तू टिप्स.

===========================================

 टैरो कार्डमध्ये हे शिकवणार-

  • टैरो कार्ड काय आहे आणि कसे काम करते.
  • वर्तमान आणि भविष्य कसे ओळखतात
  • फलादेश कसे करतात
  • सर्वोत्कृष्ठ  टैरो कार्ड रीडर बनण्यासाठी टिप्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact