मुलींनी फेर धरून नागपंचमीची गायली गाणी
by kanya news||
सोलापूर : सुरवसे यस्कूलमध्ये दि. ९ ऑगस्ट क्रांती दिन आणि नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रशालेच्या प्राचार्या उज्वलाताई साळुंखे या होत्या.र प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेतील सहशिक्षक- समाजशास्त्र विषय शिकवणारे नागेश हिरेमठ, समाजशास्त्र विषय शिकवणाऱ्या वर्षा रणपिसे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच नागदेवतेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
प्रशालेतील श्रावणी लोखंडे हिने क्रांती दिन व नागपंचमीचे महत्त्व आपल्या भाषणातून विषद केले. प्रमुख पाहुणे नागेश हिरेमठ यांनी ‘क्रांती’ या शब्दाचा अर्थ सांगून आपल्या देशासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करा, असे आवाहन केले. वर्षा रणपिसे यांनी नागपंचमीचे महत्त्व सांगून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे आवाहन केले. प्राचार्या उज्वलाताई साळुंखे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ऑगस्ट क्रांती दिन व नागपंचमी या दोन्ही दिवसांचे महत्त्व सांगून आपण हे सण साजरे का करतो, त्या मागचे शास्त्रीय कारण सांगितले. यानंतर सर्व मुलींनी फेर धरून नागपंचमीची गाणी म्हटली. फुगड्या घातल्या व विविध पारंपरिक खेळही खेळले.