मुली-महिला खेळाडूंसाठी स्वतंत्र चेंजिंग-ड्रेसिंग रूमची व्यवस्था करण्याची मागणी
By Kanya News||
सोलापूर : जेंव्हा महिला-पुरुष खेळाडूंसाठी एकच कॉमन शौचालय असते तेंव्हा नेमकी कशी फजिती होते? खेळाडूंची खास करून महिला-मुलींची नेमकी कशी अडचण-गोची निर्माण होते? याची प्रचिती स्पर्देदरम्यान उपस्थित असलेल्या कन्या न्यूजच्या प्रतिनिधीसमोर दिसून आली. येथे महिला-पुरुष खेळाडूंसाठी चेंजिंग-ड्रेसिंग रूम स्वतंत्र नसल्याने सर्वांनाच वेटिंगवर (waiting) रहावे लागत होते. अनेक मुली या लाजून या बाथरूमला देखील जाण्यापासून टाळत होत्या. दचकत होत्या. पालक, क्रीडा शिक्षक, संघटक, कोच यांना देखील बाथरूमला जाण्यासाठी वेटिंगवर राहावे लागत होते. एखादा पुरुष-मुलगा अथवा खेळाडू बाथरूमला गेला की बाहेर सर्वांनाच वेटिंगवर उभे राहावे लागत होते.
दरम्यान, प्रत्यक्षदर्शी “कन्या न्यूज”च्या प्रतिनिधीला सदरची अडचण खास करुन मुलीची, महिला खेळाडूंची अडचण लक्षात आली. त्यांनी सहज म्हणून याची चौकशी सुरु केली. तेथील उपस्थित काही खेळाडू, पालक, संघटक, क्रीडा शिक्षक, महिला पालक-मुलींची चौकशी केली असता त्यांचा लक्षात आले की कॉमन एकच कॉमन शौचालय, (toilet) बाथरूम असल्याकारणाने अडचण होत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी उपस्थित अनेकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर महिला-पुरुष महिला-पुरुष खेळाडूंची शौचालयाबाबतीत खूपच मोठी गैरसोय होत असल्याचे सांगितले.

सोलापूर : मुळे पावेलीयन हॉल येथे सुरु असलेल्या शालेय टेबल टेनिस स्पर्धेतील एक क्षण.
-
यासंदर्भात महापालिकेचे क्रीडाधिकारी श्रीकांत घोलप यांना विचारले असता ते म्हणाले, माहिती घेऊन सांगतो. तशी व्यवस्था करून देतो. मुळे पव्हेलीयन हॉल येथे खालच्या बाजूस टेबल टेनिससाठी हॉल आणि कोर्ट उपलब्ध करून देण्यात आले आहे. वरच्या बाजूस महापालिकेचे क्रीडा कार्यालय आहे. हॉल लगतच दोन शौचालय असून, एक बंद अवस्थेत होते. तेही जर स्पर्धेदरम्यान खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिल्यास गैरसोय होणार नाही, असे काही क्रीडा शिक्षक आणि कोच, खेळाडूंनी सांगितले.