अनिल चोरमले, युवराज नाईक यांच्यासह आठ जणांना पदोन्नती:दि. १ जानेवारी २०२४ ची अंतरिम सेवा ज्येष्ठता सूची
By Kanya News
सोलापूर : क्रीडा व युवक संचालनालयातील उप संचालक अनिल चोरमले, युवराज नाईक यांच्यासह आठ जणांना पदोन्नती मिळाली आहे. युवराज नाईक पदस्थापनेच्या प्रतीक्षेत आहेत. अनिल चोरमले, युवराज नाईक, संजय सबनीस,सुहास पाटील,विजय संतान,शेखर पाटील,नवनाथ फरताडे,स्नेहल साळुंखे,उदयकुमार जोशी, माणिक पाटील या दहा जणांना पदोन्नती मिळाली आहे.
पदोन्नती मिळालेले उपसंचालक,अधिकारी पुढीलप्रमाणे-
अनिल चोरमले, युवराज नाईक, संजय सबनीस,सुहास पाटील,विजय संतान,शेखर पाटील,नवनाथ फरताडे,स्नेहल साळुंखे,उदयकुमार जोशी, माणिक पाटील
क्रीडा व युवक सेवा, पुणे संचालनालयाच्या आस्थापनेवरील उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांची दि. १ जानेवारी २०२४ ची अंतरिम सेवा ज्येष्ठता सूची दि. १६ एप्रिल २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रसिद्ध केली असून, त्यानुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांच्या सूचना हरकती मागविण्यात आल्या होत्या. क्रीडा व युवक संचालनालयातील उप संचालक, क्रीडा व युवक सेवा या संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.१ जानेवारी २०२४ रोजीच्या स्थिती दर्शविणारी अंतीम सेवा ज्येष्ठता यादी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक: संक्रीआ-१३२४/प्र.क्र.४३/क्रीयुसे-२ अन्वये दि. १२ जुलै २०२४ रोजी प्रसिद्धी पत्रकान्वये जाहीर करण्यात आले आहे.
क्रीडा व युवक सेवा, पुणे संचालनालयाच्या आस्थापनेवरील उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांची दि. १ जानेवारी २०२४ ची अंतरिम सेवा ज्येष्ठता सूची दि. १६/ एप्रिल २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रसिद्ध केली असून त्यानुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांच्या सूचना हरकती मागविण्यात आल्या होत्या. उपरोक्त शासन निर्णयाच्या अनुषंगाने आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांचेकडून प्राप्त झालेल्या सूचनेनुसार ज्येष्ठता सृचीच्या यादीतील तपशीलात बदळ करून दि.१ जानेवारी २०२४ रोजीच्या स्थिती दर्शविणारी अंतीम सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवरील उप संचालक, क्रीडा व युवक सेवा या संवर्गातील अधिकाऱ्यांची दि १ जानेवारी २०२४ रोजीची स्थिती दर्शविणारी अंतीम सेवा ज्येष्ठता यादी सोबत जोडलेल्या परिशिष्ट – अ नुसार अंतीम करण्यात आल्याचे पत्रकान्वये कळविण्यात आले आहे. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेताक (२०२४०७१२१७०१०२३५२१) असा आहे.