पंढरपूर :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागाने तयार केलेल्या  स्वच्छ वारी निर्मल वारीच्या पार्श्वभूमीवर 'वारी महाराष्ट्र धर्म' या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले.

By kanya news

पंढरपूर :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागाने तयार केलेल्या  स्वच्छ वारी निर्मल वारीच्या पार्श्वभूमीवर ‘वारी महाराष्ट्र धर्म’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. तसेच ग्राम स्वच्छता विभागाच्या लोगोचे अनावरण ही झाले. यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कृषी भूषण गोविंदराव पवार, मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे, जिल्हा समन्वयक सचिन जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पंढरपूर पंचायत समिती परिसरात आयोजित स्वच्छ वारी निर्मल वारी कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

स्वच्छ वारी निर्मल वारी या उपक्रमाची सविस्तर माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी आपल्या प्रस्ताविकात दिली. यावर्षी ग्रामविकास विभागाने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेला दहा कोटीचा भरीव निधी दिल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे वारकऱ्यांना आवश्यक सुविधा देणे जिल्हा परिषदेला शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. या समारोप कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या कला पथकाचा गौरव: राज्यभर कला सादर करण्याची संधी :   

स्वच्छ वारी निर्मल वारी कार्यक्रमात कला पथकाच्यावतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जनजागृतीचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर करण्यात आले. या कला पथकाच्या वेगळ्या सादरीकरणाच्या पद्धतीमुळे मुख्यमंत्र्यांनी या योजनेची राज्यभरात प्रसिद्धी करण्याचे काम जिल्हा परिषदेच्या या कला पथकाला देऊन या कला पथकाच्या कामाचा गौरवही केला व  त्यांची आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact