सोलापूर शहर तालीम संघाच्यावतीने आयोजन
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सोलापूर शहर तालीम संघाची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा मंगळवार, दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी “डाळिंबी आड मैदान, शिंदे चौक सोलापूर येथे होणार आहे. लोणीकंद (पुणे) येथे दि. २२ व २३ फेब्रुवारी रोजी वरिष्ठ ग्रिको रोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा तसेच पहिली ग्रिको रोमन महाराष्ट्र केसरी कुस्ती होणार आहेत. या स्पर्धेसाठी सोलापूर शहर तालीम संघाची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे.
सोलापूर शहर तालीम संघाची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा मंगळवार, दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी “डाळिंबी आड मैदान शिंदे चौक” सोलापूर येथे होणार आहे. सकाळी १० ते १२ या वेळेत वजने होतील. त्यानंतर कुस्ती स्पर्धेस प्रारंभ होईल. या स्पर्धेसाठी ग्रिको रोमन ५५, ६०, ६३, ६७, ७२, ७७, ८२, ८७, ९७ आणि १३० किलो वजनी गटासाठी निवड चाचणी घेण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सहभागी खेळाडूंची जन्मतारीख जून २००४पूर्वीची असावी. सन २००५-0६ मध्ये जन्म झालेल्या खेळाडूंसाठी मेडिकल सर्टिफिकेट व पालकांचे संमतीपत्र असणे आवश्यक आहे.वयाचा व रहिवासी पुरावा म्हणून ओरिजनल आधार कार्ड व पासपोर्ट ग्राह्य धरण्यात येईल. अहिल्यानगर येथे झालेल्या वरिष्ठ गट अजिंक्यपद स्पर्धेतील प्राविण्य धारक कुस्तीगिराला या स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
स्पर्धेसाठी खेळाडूला १ किलो वजनाची सुट राहील. या स्पर्धेत सोलापूर शहर व जिल्ह्यातील खेळाडूंना भाग घेता येणार आहे. अधिक माहितीसाठी अर्जुन साठे ( ९१४६८९४८२५), आतीश मोरे (८९२८८९२१११), रोहित इगवे (७०२०८२८७१६) यांच्याशी संपर्क साधावा. असे सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व कुस्तीगीर,वस्ताद मंडळींना कळविण्यात येते आहे. तरी सोलापूर शहर व जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन शहर तालीम संघाचे अध्यक्ष आ. विजयकुमार देशमुख आणि सचिव अमर दुधाळ यांनी केले.