विडी कामगारांना किमान वेतनाप्रश्नी कामगार मंत्र्याकडून न्याय मिळत नसल्यामुळे मुख्यमंत्र्याकडे कांही संघटनेसह धडकणार : डॉ. गोवर्धन  सुंचू

by kanya news||

सोलापूर : विडी कामगारांना किमान वेतनाप्रश्नी कामगार मंत्र्याकडून न्याय मिळत नसल्यामुळे मुख्यमंत्र्याकडे  दाद मागणार असून, येत्या दि. १५ ऑगस्ट रोजी घटनेचे शिल्पकार व भारताचे प्रथम कायदेमंत्री महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळया समोर, पार्क चौक, सोलापूर येथे अभिवादन करुन विडी कामगारांना किमान वेतन मिळावा, यासाठी व महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री यांचा जाहीर निषेध करण्यासाविविध कामगार संघटनांनी एकत्रित येऊन संयुक्तरित्या  एक  तासाचे धरणे आंदोलन करून कामगार मंत्री यांचा निषेध करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कामगार सेलचे  गोवर्धन  सुंचू व कामगार सेनेचे विष्णू कारमपुरी यांच्यासह विविध कामगार संघटनेच्या पदाधिकार्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

महाराष्ट्रातील विडी कामगारांना किमान वेतन मिळावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्रपवार कामगार संघटना, कामगार सेना, नवमहाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना, राष्ट्रीय मजदूर संघ आदी संघटनेनी विडी कामगारांना किमान वेतन कायदयाप्रमाणे मजुरी मिळावी, यासाठी अनेकवेळा सोलापूर पुणे, मुंबई डॉ. गोवर्धन संचू, विष्णु कारमपुरी महाराज, सायण्णा तेगळ्ळी, राहुल गुजर आदी कामगार संघटनेच्या अध्यक्षांनी एकत्रित येऊन सोलापूर सह महाराष्ट्रातील किमान ५ ते ६ लाख विडी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे मजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आजपर्यत विडी कामगारांना न्याय मिळवून दिले नाही, त्यामुळे  त्यांचा निषेध करीत असल्याचे सांगण्यात आहे.

वास्तविक पाहता, सोलापूर, संगमनेर, अहमदनगर, इंचलकरंजी, वाशिम, नांदेड, जालना, भिवंडी, पुणे, गडचिरोली, नागपूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, मालेगांव, आदि जिल्हयात किमान ५ ते ६ लाखाचे आसपास विडी कामगार आहेत. त्यांना सध्याचे सरकार स्थापनेपासून विडी कामगाराकडे दुर्लक्ष करीत आहेत. विडी कामगार अत्यल्प मजुरीवर त्यांचे जीवन जगत आहेत. विडी कामगारांना गेल्या ८ ते १० वर्षापासून सहा. कामगार आयुक्त, पुणे येथील अप्पर कामगार आयुक्त, महाराष्ट्र कामगार आयुक्त यांना अनेकवेळा भेटून विडी कामगारांना किमान वेतन कायद्कायाप्यरमाणे वेतन मिळवून देण्यात देण्याची विनंतीवजा मागणी करण्यात आली. परंतु,  कोणत्याही अधिकार्यांनी विडी कामगारांना न्याय मिळवून दिलेला नाही. मुंबईत एकदा कामगार मंत्री सुरेख खाडे यांनी २ ते ३ महिन्यापुर्वी लोकसभेच्या निवडणुकीपुर्वी अ बैठक बोलाविले मात्र ते त्वरीत कांही कारणांस्तव रद्दही केले.  वरील संघटनेच्या सर्व अध्यक्षांनी संयुक्तरित्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये फिरुन कामगारांना कामगार मंत्न्यार्ययांकडून न्याय मिळू शकले नाही,  याबाबत सर्व जिल्ह्यांमध्ये बैठका आयोजित करणार आहोत.

गेल्या तीन वर्षापासून कामगार मंत्र्याकडून विडी कामगाराविषयी एकदाही बैठक घेतलेले नाहीत.  त्यामुळे त्यांचा निषेध नोंदविण्यासाठी  दि. १५ ऑगस्ट रोजी  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयासमोर, पार्क चौक, सोलापूर येथे अभिवादन करुन विडी कामगारांना किमान वेतन मिळावा, यासाठी  सर्व कामगार संघटनांनी एकत्रित येऊन संयुक्तरित्या एक तासाचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

या पत्रकार परिषदेत  सायबण्णा तेग्गेळळी  ( नवमहाराष्ट्र कामगार संघटना),  राहुल गुजर (राष्ट्रीय मजदूर संघ) उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact