वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ, एस.एस. साबळे वीरशैव ट्रस्टचा उपक्रम

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : श्री वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ व एस.एस साबळे वीरशैव ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढ मास कार्यक्रमाच्या निमित्ताने संगीत शिवमहापुराण कथा व अय्याचार दीक्षा या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ, सोलापूर व एस. एस साबळे वीरशैव ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने लोककल्याणासाठी सालाबादप्रमाणे या वर्षीही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम सोहळा बुधवार, दि. १६ जुलै ते सोमवार, दि. २१ जुलै २०२५ पर्यंत श्री शिवानुभव मंगल कार्यालय (मीठ गल्ली, सोलापूर) येथे पार पडणार आहे.

यंदाचा कार्यक्रम सोहळा लिंगैक्य १०८ ष. ब्र. श्री तपोरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य स्वामीजी, बृहन्मठ होटगी यांच्या आशीर्वादाने व ज्ञानसिंहासन जगद्गुरू श्री श्री श्री १००८ डॉ मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ यांच्या दिव्य सानिध्यात हा कार्यक्रम पार पडणार आहे.

याप्रसंगी श्री वीरभद्र शिवाचार्य स्वामीजी (कडगंची), श्री पंचाक्षरी शिवाचार्य स्वामीजी (माळकवठा), श्री शिवाचार्य रत्न जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी (गौडगाव), श्री श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी (नागणसूर), श्री नीलकंठ शिवाचार्य स्वामीजी (मैंदर्गी), श्री शांतलिंगेश्वर शिवाचार्य स्वामीजी (कल्लहिप्परगा),श्री सुगुरेश्वर शिवाचार्य स्वामीजी (शहापूर), श्री जयगुरु शांतलिंगाराध्या शिवाचार्य स्वामीजी (हिरेजेवरगी), श्री शांतलिंगेश्वर शिवाचार्य स्वामीजी (कल्लहिप्परगा), श्री शिवयोगी शिवाचार्य स्वामीजी (अंदमान नाविदगी), श्री बसवलिंग स्वामीजी (अक्कलकोट), श्री स्वामीनाथ स्वामीजी किरीटमठ (सोलापूर) आदी महास्वमिजींची उपस्थिती लाभणार आहे.

  • बुधवार, १६ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता पंचाचार्य ध्वजारोहण, विघ्नेश्वर व कामेश्वर लिंगास रुद्राभिषेक करून जगद्गुरू श्री श्री श्री १००८ डॉ मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता १०८ ष. ब्र. स्वरसम्राट अमृतेश्वर शिवाचार्य स्वामीजी (अमृतेश्वरमठ संस्थान जिंतूर) यांच्या रसाळवाणीतून संगीत शिवमहा पुराण कथा होणार आहे. गायक विकास महाराज (जिंतूर), संगीतकार श्री संतोष महाराज (सेलू), तबला वादक श्री चैतन्य महाराज (नांदेड) यांच्या संगीत साथीने हा कार्यक्रम होणार आहे. यानंतर जगद्गुरूंचे आशीर्वचन व महाप्रसाद कार्यक्रम होईल.
  • शिवमहापुराण बुधवार, १६ जुलै ते सोमवार २१ जुलै २०२५ पर्यंत रोज सायंकाळी  होणार आहे.
  • सोमवार, दि. २१ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता जंगम बटूना अय्याचार, शिवभक्तांना शिवदीक्षा विधी सोहळा शिवाचार्य यांच्या उपस्थितीत   होणार आहे. मंगळवार, दि. २२ जुलै २०२५ रोजी सकाळी  ११ वाजता कार्यक्रमाची सांगता व एस.एस. साबळे वीरशैव ट्रस्ट यांच्यावतीने महाप्रसादाच्या कार्यक्रमांनी याची सांगता होणार आहे.

तरी सोलापूर शहर व परिसरातील भक्तांनी या धार्मिक शिवमहा पुराण कथाचे लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे संस्थापक डॉ. शिवयोगी शास्त्री होळीमठ, अध्यक्ष वे. श्री. बसवराज पुराणिक, मंडळ सदस्यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस सचिव विद्यानंद स्वामी, खजिनदार कल्लय्या गणेचारी, संचालक नंदकिशोर हिरेमठ, रेवणय्या स्वामी, लिंगराज स्वामी खंडाळ, योगिनाथ होळीमठ उपस्थित होते. सिद्धय्या स्वामी-हिरेमठ, सिद्धाराम साबळे, चिदानंद मुस्तारे, संगय्या स्वामी, विजयकुमार भोगडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *