जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर बार असोसिएशन आणि सोलापूर ऑर्थोपेडिक सोसायटीचा उपक्रम
आज मोफत हाडाची घनता तपासणी शिबीर
By Kanya News
सोलापूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर बार असोसिएशन आणि सोलापूर ऑर्थोपेडिक सोसायटी याच्यावतीने गुरुवार, दि. १८ जुलै २०२४ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा न्यायालय आवार येथे मोफत हाडाची घनता तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमास सोलापूर ऑर्थोपेडिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गुरुनाथ वच्चे, सचिव डॉ. सुनील हंद्राळमठ, रोटरी क्लब ऑफ ईस्टचे अध्यक्ष सचिन जोशी, सचिव कार्तिक चव्हाण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम.एस.आझमी, सचिव उमेश देवर्षी, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अमित आळंगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.