शनिवारी उर्दू घर येथे होणार कार्यक्रम
By Kanya News||
सोलापूर : सोलापूररातील साहित्य क्षेत्रात ज्यांनी भरीव कामगिरी केली अशा नामांकित साहित्यकांचा सन्मान व्हावा तसेच नवोदित शायराना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने सोलापूरातील “शायरांची मैफील” या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उर्दू घर सांस्कृतिक समितीचे उपाध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी दिली.
या मैलिलीच्या अध्यक्षस्थानी अब्दुल रशीद अर्शद व निवेदक आसिफ इकबाल असणार आहेत. सोलापुरातील शायर मीर अफजल मीर, बशीर अहमद बशीर, वहाब जमील, हबीब अहमद शौक, अजिजूल वहाब, शफी सत्तारी, जाकीर तनवीर, आरजू राजस्थानी, नासीर अशरफी, रफी नवाज, अब्दूल शुकूर शौर, इक्बाल दुर्वेश, बाकर हाफीज साहब, तालीब सोलापुरी, अशफाक जैद, नजमुद्दीन अंजूम, इरफान कारीगर, शादा पितापुरी, सरफराज बंदेनवजी, वजाहत अब्दूल सत्तार, आदींचा समावेश राहणार आहे. तरी उर्दू प्रेमी रसिकांनी या अनोख्या मुशायराच्या मैफिलीत उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहनही उर्दू घर सांस्कृतिक समितीचे उपाध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी केले आहे.
-
ही मैफील शनिवार, दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता उर्दू घर सोलापूर (छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय समोर) होत आहे. या मुशायरामध्ये सोलापूर तसेच सोलापुरातील ज्येष्ठ शायरांचा व नवोदित कवींचा सहभाग असणार आहे.