सोलापूर विद्यापीठातील राज्यस्तरीय कार्यशाळेत उद्योजक राम रेड्डी यांचे आवाहन

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : विद्यार्थ्यांनी एखाद्या कल्पना व प्रकल्पांना घेऊन पुढे जावे, त्यावर काम करावे. दुसऱ्यांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा छोटे-मोठे उद्योग, व्यवसाय उभा करून उद्योजक बनण्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन बालाजी अमाईन्सचे कार्यकारी संचालक डी. राम रेड्डी यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन संकुलामार्फत पीएम उषा योजनेअंतर्गत ‘उद्योजकता जोपासणे’ या विषयावर आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन राम रेड्डी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा होते. यावेळी कुलसचिव योगिनी घारे, स्पेनका वॉटरचे सुहास आदमाने, विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी महादेव खराडे, वाणिज्य व व्यवस्थापन संकुलाचे प्रभारी संचालक डॉ. आर. एस. मेंथे आदी उपस्थित होते.

  • उद्योजक राम रेड्डी म्हणाले, विद्यार्थ्यांनी रेडीमेड जॉबच्या मागे न लागता स्वतः उद्योजक होण्यासाठी विद्यार्थी दशेपासूनच काम करावे. कष्ट, संयम, जिद्द व संघर्षाच्या बळावर उद्योग, व्यवसायात निश्चित यश प्राप्त होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एखाद्या उद्योगाचे व्यवस्थितरित्या अभ्यास करून उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच कुटुंबाचीही मदत विद्यार्थ्यांनी घ्यावी.
  • प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा म्हणाले, उद्योग, व्यवसायामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होण्याबरोबरच उद्योजकाचा आर्थिकस्तर देखील उंचावतो. देशाच्या प्रगतीत उद्योगाचा महत्त्वाचा वाटा आहे. आर्थिक उलाढाल यामुळे मोठ्या प्रमाणात होते. विद्यार्थ्यांनी उद्योजकतेकडे वळावे. 
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन संकुलामार्फत ‘उद्योजकता’ विषयावर आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन राम रेड्डी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, स्पेनका वॉटरचे सुहास आदमाने, विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी महादेव खराडे, वाणिज्य व व्यवस्थापन संकुलाचे प्रभारी संचालक डॉ. आर. एस. मेंथे.

याप्रसंगी स्पेनका वॉटरचे सुहास आदमाने यांनी उद्योजक कसा घडलो? याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. संकुलाची माहिती डॉ. आर. एस. मेंथे यांनी दिली. मान्यवरांचा परिचय डॉ. जयश्री मुंडेवाडीकर आणि प्रा. वनिता व्हनमाने यांनी करून दिला. आभार प्रदर्शन प्रा. सय्यद यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact