सोलापूर विद्यापीठातर्फे कॉ. प्रभाकर यादव व्याख्यानमाला

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण या संकल्पनेच्या माध्यमातून कर रूपाने मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी उपलब्ध होत आहे. हा निधी विकसनशील कामांना गती देण्यासाठी वापरला जात आहे. त्याचबरोबर देशाची बँकिंग व्यवस्था सुदृढ होण्यासाठी ही प्रयत्न होत असल्याचे रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कॉम्रेड प्रभाकर यादव व्याख्यानमाला हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृह येथे पार पडली. याप्रसंगी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांनी ‘बदलते अर्थकारण’ या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, वित्त व लेखा अधिकारी एम. एस. खराडे, बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन संभाजीनगरचे अध्यक्ष देविदास तुळजापूरकर, जनरल सेक्रेटरी धनंजय कुलकर्णी, वाणिज्य व्यवस्थापन संकुलाचे संचालक डॉ. आर. एस. मेंथे उपस्थित होते.

याप्रसंगी मराठे म्हणाले, सार्वजनिक बँकिंग व्यवस्थेची कार्यक्षमता सुधारली आहे. सूक्ष्म व लघु उद्योगांची संख्या वाढत आहे. शेती क्षेत्रामध्ये विकासाचा वेग वाढत आहे. माती परीक्षण योजनेच्या माध्यमातून शेतीचा विकास होत आहे. प्रक्रिया उद्योग, गोदाम व्यवस्था विकसित होताना दिसत आहे. देशाचा विकास चिरंतन झाला पाहिजे. महिलांना देशाच्या विकासात सहभागी करून घेणे आवश्यक आहे. विकासाच्या प्रक्रियेत समाजातील प्रत्येक घटकाला समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.

  •  डॉ. लक्ष्मीकांत दामा म्हणाले, देशाच्या विकासामध्ये बँकांची भूमिका महत्त्वाची आहे. लघु व मध्यम उद्योगांना  कर्जपुरवठा केला तर विकासाला चालना मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन समन्वयक डॉ. वनिता सावंत यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सौजन्य घंटे यांनी केला. आभार प्रदर्शन डॉ. रश्मी दातार यांनी  केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. विघ्नेश नादरगी, डॉ. इम्तियाज सय्यद, डॉ. जयश्री मुंडेवाडीकर, मुग्धा जगदाळे, वनिता होनमाने यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact