दि. १२ जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती; केंद्रीय संचार ब्यूरो, विवेकानंद केंद्र सोलापूर यांचा उपक्रम

  • सामूहिक सूर्यनमस्कार, रक्तदान शिबीर, व्याख्यान, प्रश्नमंजुषा स्पर्धा, सेल्फी बूथ, पुस्तक प्रदर्शन

कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर  : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दि. १२ जानेवारी रोजी देशभरात राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो आणि विवेकानंद केंद्र, सोलापूर यांच्यावतीने रविवार, दि. १२ ते १४ जानेवारी २०२५ दरम्यान सामूहिक सूर्यनमस्कार, रक्तदान शिबीर, व्याख्यान, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि पुस्तक प्रदर्शन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती केंद्रीय संचार ब्युरोचे सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव आणि विवेकानंद केंद्राचे नगर प्रमुख रवी कंटील यांनी दिली आहे.

रविवार, दि. १२ जानेवारी रोजी श्री हनुमान मंदिर पटांगण, माधवनगर येथे सकाळी ६.३० ते ७.३०0 यावेळेत  मदगोंडा पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांसाठी सामूहिक सूर्यनमस्काराचा अभ्यास घेण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी श्रुतिका दासरी (७२४९६६३३४०) यांच्याशी संपर्क साधावा.

तसेच दमाणी सांस्कृतिक भवन, विवेकानंद केंद्र, रेल्वे लाईन्स येथे सकाळी ९ ते दुपारी ३ यावेळेत रक्तदान शिबीर, व्याख्यान, प्रश्नमंजुषा स्पर्धा, सेल्फी बूथ, पारितोषिके वितरण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे राविवार, दि. १२ ते १४ जानेवारीपर्यंत दररोज संध्याकाळी ५ ते ९ या कालावधीमध्ये विवेकानंद यांच्या जीवनावरील आणि अन्य साहित्यावर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे.
स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा, मूल्यांचा आणि आदर्शांचा प्रचार करणे आणि त्यांचे विचार देशातील प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचवणे हा यामागचा उद्देश आहे. सदर उपक्रमात जास्तीत जास्त युवक-युवती यांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact