सूद चॅरिटी फाऊंडेशनतर्फे सिव्हील हॉस्पिटलमध्ये

४० लाखांच्या सौरउर्जा प्रकल्पाची उभारणी

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर :   प्रसिद्ध अभिनेते आणि समाजसेवी सोनू सूद यांच्या सूद चॅरिटी फाऊंडेशनतर्फे सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हील हॉस्पिटल) ४० लाख रुपये खर्चाच्या सौरउर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती सूद चॅरिटी फाऊंडेशनतर्फे  सोनू सूद चॅरिटी क्लब सोलापूरचे संस्थापक  विपुल मिरजकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सार्वजनिक आरोग्य सुविधा सुधारणे या आपल्या मिशन अंतर्गत  आणखी एक  महत्वाचे पाऊल उचलले आहे. सोलापूर जिल्ह्यातील शासकीय  रुग्णालयात  फाऊंडेशनने स्वतंत्रपणे सौरउर्जा प्रकल्प उभारला आहे. रुग्णालयाची उर्जा स्वतंत्रपणे आणि  वैद्यकीय सेवेसाठी सतत आणि स्वतंत्रपणे वीज पुरवठा सुनिश्चित करणे हा उद्देश आहे.

या सौरउर्जा प्रकल्यास स्वच्छ आणि शाश्वत उर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे. ज्यामुळे रुग्णालयाची पारंपारिक उर्जा स्त्रोतांवर अवलंबित्व कमी होईल आणि विजेच्या खर्चात लक्षणीय बचत होईल. या व्यतिरिक्त हा हरित उर्जा उपक्रम पर्यावरणीय जबाबदारीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आरोग्य सेवा समस्याचे निराकरण करण्याच्या फाऊंडेशनच्या दृष्टीकोनाची संरेखित आहे. सूद चॅरिटी फाऊंडेशनचे सदस्य आणि सोनू सूद चॅरिटी क्लब सोलापूरचे संस्थापक विपुल मिरजकर यांच्या माध्यमातून हा प्रकल्प सोलापूरात राबविला जात आहे. तो आपल्या सोलापूर येथील सरकारी रुग्णालय व सोलापूरच्या नागरीकांसाठी महत्त्वाचे पाऊल आहे. सूद चॅरिटी फाउंडेशनच्या सहकार्याने आणखी एक प्रकल्प साकारण्यास विपुल मिरजकर तयार असून,  ज्याचा थेट फायदा समाजातील वंचित घटकांना होवू शकेल.

हा सौरउर्जा प्रकल्प रूग्णालयातील अपातकालीन यॉर्ड, ऑपरेशन थिएटर आणि अतिदक्षता विभाग यासारख्या अतिसंवेदनशील अशा गंभीर  क्षेत्रांना मदत होईल. ज्यामुळे  जीवन वाचवण्याच्या प्रक्रियेवर विज कमात होणार नाही, याची खात्री होईल. याचा थेट परिणाम रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांच्या गुणवत्तेवर होणार असून, वैद्यकीय सेवा अखंडीतपणे चालू शकतील. सूद चॅरिटी फाऊंडेशन आरोग्य, शिक्षण आणि उपजिविका समर्थनासाठीच्या पुढाकारांसाठी ओळखले जाते. लक्ष्यित आणि प्रभावी प्रकल्पांद्वारे समाजाची प्रगती करण्यात सक्रिय भुनिका बजावतील.

श्वासात उपायांद्वारे जीवन सुधारण्याच्या त्यांच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वपूर्ण असा सौर उर्जा प्रकल्प सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये  स्थापना केली जात आहे.या पत्रकार परिषदेस सोनू सूद चॅरिटी क्लबचे मेंबर्स आनंद पवार, शरणप्पा फुलारी, सदानंद रापेल्ली, विशाल काळे, अनुराधा काबरा, भास्कर नडीमेटला, अमोल धडके, शुभम सब्बन आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact