६३ वी सुब्रोतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्रीडा स्पर्धा :२०२४-२५
१५ वर्षे मुले आणि १७ वर्षे मुले / मुलींच्या स्पर्धेनी शुभारंभ
By Kanya News
सोलापूर: जिल्हास्तर सुब्रोतो कप फुटबॉल क्रीडा स्पर्धेनी शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात होणार असून, १५ वर्षे मुले व १७ मुले / मुलींची स्पर्धेनी सुरुवात होणार आहे. क्रीडा व युवकसेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित ६३ सुब्रोतो मुखर्जी स्पोटर्स एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली व्दारा सन २०२४-२५ या वर्षात ६३ वी आंतरराष्ट्रीय सुब्रोतो कप फुटबॉल ( ज्यूनिअर ) क्रीडा स्पर्धा सन २०२४ चे आयोजन करण्यात येणार आहे. असे सोलापूर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने पत्रकान्यये क्रीधाधिकारी नरेंद पवार, राज्य मार्गदर्शक गणेश पवार यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी राज्य मार्गदर्शक गणेश पवार (मो.न ९९७००९५३१५) यांच्याशी संपर्क साधावा, असे
कळविण्यात आले आहे. सदर राष्ट्रीय स्पर्धाची राज्य संघाची प्रवेशिका दि. २५ जुलै २०२४ पूर्वी पाठविणे बंधनकारक आहे. यासाठी राज्यस्तरीय व विभागस्तरीय सुब्रतो फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेचे आयोजनापूर्वी जिल्हास्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.या वर्षापासून पुढे १४ वर्षाखालील मुले सबज्यूनिअर या ऐवजी १५ वर्षाखालील मुले या वयोगटाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून या स्पर्धा बंगळूरू या ठिकाणी व १७ वर्षाखालील मुले व मुली (ज्यूनिअर) या वयोगटाच्या स्पर्धा दिल्ली येथे दि. ३० जुलै ते ११ सप्टेंबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. तरी सोलापूर जिल्हयातील सर्व शाळा/महाविदयालये मुख्याघ्यापक व क्रीडा शिक्षक यांना कळविण्यात येते की,आपल्या शाळेचे संघ निवड करुन सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता dsosolapur1@gmail.com या संकेत स्थळावर खेळाडू व संघाची नोंदणी करणे अनिवार्य आहे. सदर स्पर्धेच्या प्रवेशिका ( ऑनलाईन ) दि. १७ जुलै २०२४ रोजी पर्यंत नोंदवावीत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केलेले आहे.