युवकांसाठी खुशखबर..!
युवकांनो! युवा प्रशिक्षण योजनेंतर्गत अर्ज करा
अन नोकरी मिळविण्याची क्षमता वाढवा
by kanya news ||
सोलापूर : युवकांसाठी आता एक आनंदाची बातमी असून, राज्य परिवहन महामंडळात १८८ जागांसाठी सहा महिन्यांचा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी सोलापूर राज्य परिवहन महामंडळात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
image source
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूर विभाग येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी सदर योजना राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने विविध पदासाठी एकूण १८८ जागांसाठी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून अर्ज मागविण्यात येत आहेत.
image source
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणासाठी बारावी उत्तीर्ण, आय.टी. आय., पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांसाठी दि. २४ ऑगस्ट २०२४ ते दि. २९ ऑगस्ट २०२४ या कालावधीत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विभागीय कार्यालय, राज्य परिवहन महामंडळ, बुधवार पेठ, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, सोलापूर यांनी कळविले आहे.