यंदापासून पंचाच्या मानधनात दुपटीने वाढ : मनपा सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले
शहरस्तरीय शालेय स्पर्धेचे आयोजन,नियोजणासाठी क्रीडाशिक्षकाची सभा
By Kanya News
सोलापूर : शालेय क्रीडा स्पर्धामध्ये पंचाची भूमिका बजावणार्या क्रीडा शिक्षकांच्या मानधनात यंदापासून दुपटीने वाढ करण्यात येईल, असे सोलापूर महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी सांगितले. महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर महानगरपालिका याच्यावतीने आयोजित द.भै.फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर यांच्या सहकार्याने शहरस्तरीय शालेय स्पर्धा सन २०२४-२५ चे आयोजन व नियोजन यासाठी क्रीडाशिक्षकांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शहरातील एकूण (अडीचशे) २५० क्रीडा शिक्षक उपस्थित होते. सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले म्हणाले, यापूर्वी पंचना दीडशे रुपये मानधन दिले जात होते. त्यात यंदाच्या चालू वर्षापासून दुपटीने वाढ करण्यात आले आहे. आता पंचना तीनशे रुपये मानाधन देण्यात येईल.
खेळाडू, क्रीडाशिक्षकांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील :
क्रीडा शिक्षक व खेळाडूंच्या ज्या काही आणि अडचणी आहेत, ते सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी यावेळी दिली. शशिकांत भोसले म्हणाले, स्पर्धा वेळेवर सुरू करू. स्पर्धेच्या ठिकाणी ज्या सुविधा आहेत, ते आम्ही उपलब्ध करून देऊ. लेदर बॉल क्रिकेट या खेळासाठी राजीव गांधी पार्क स्टेडियम मैदानाची सोय करून देण्यात येईल, असेही त्यांनी आश्वासन दिले. तसेच पंचांनादेखील टी-शर्ट उपलब्ध करून देऊ.स्पर्धेच्या ठिकाणी महानगरपालिकेचे ऑब्झर्व निरीक्षक (ऑब्सर्व्हर) म्हणून नेमण्यात येईल असे म्हणाले.