अडीचशे क्रीडा शिक्षकांची उपस्थिती; शालेय क्रीडा स्पर्धा लवकरच सुरु होतील : जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार
By Kanya News
सोलापूर: शालेय क्रीडा स्पर्धा लवकरच सुरू होतील, असा आशावाद जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांनी व्यक्त करीत शालेय राष्ट्रीय स्पर्धा नोव्हेंबर मध्ये होत असल्यामुळे जिल्हास्तरीय स्पर्धा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही दिली. तसेच शालेय क्रीडा स्पर्धेच्यावेळी रज कोणी नियमबाह्य वागत असतील तर त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर महानगरपालिका याच्यावतीने आयोजित द.भै.फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर यांच्या सहकार्याने शहरस्तरीय शालेय स्पर्धा सन 2024/25 आयोजन व नियोजन यासाठी क्रीडाशिक्षकांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शहरातील एकूण (अडीचशे) २५० क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

याप्रसंगी दयानंद कॉलेजचे उपप्राचार्य प्रा.अरुण खांडेकर, सोलापूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार, महानगरपालिका क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलप, तालुका क्रीडाधिकारी गणेश पवार, क्रीडाधिकारी सत्येन जाधव, शारीरिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव, अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक प्रमोद कुनगुलवार, आभार प्रदर्शन प्रा. दळवी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. शैलेश बंडे यांनी परिश्रम घेतले.