काही तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा
क्रीडाधिकारी सत्येन जाधव यांचे आवाहन
By Kanya News
सोलापूर: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाची dsosolapur.com ही वेबसाईट व्यवस्थित चालू आहे. त्यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण
नाही. लॉगीन आयडी, पासवर्ड टाकल्यास वेबसाईट ओपन होत नाही. जरी काही अडचण आली तर क्रीडा शिक्षकानी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन क्रीडा अधिकारी सत्येन जाधव यांनी “कन्या न्यूज”शी बोलताना सांगितले.
शालेय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ या चालू शैक्षणिक वर्षासाठी तालुकास्तरीय ब्फ्ज खेळांच्या सहभाग नोंदीसाठी सोलापूर जिल्ह्यातील शाळांना ऑनलाईन प्राथमिक प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे.
शाळेचे लॉगीन आयडी, मुख्याध्यापक यांचा नंबर चुकीचा टाकल्यास वेबसाईट ओपन होत नाही. काही तांत्रिक अडचणी असतात.त्यामुळे अशी अडचण येत असते. तालुक्यातील शेडूल भरण्याचे काम सुरु आहे. शहर व जिल्हाचे अद्याप भरावयाचे आहे. ग्रामीण भागातील ९ तालुक्यातून जे खेळ घेतले जातात, त्या सर्व तालुक्यांचे ऑनलाईन फॉर्म भरण्याचे काम झाले आहे. त्याशिवाय खेळाडूची नावे उपलोड करू शकत नाहीत. प्रायमरीसाठी फॉर्म फी भरून कोणत्या खेळात खेळाडूंना सहभाग नोंदवावयाचा आहे, त्याची यादी अपलोड केले की यादी करून स्पर्धेपूर्वी एक दिवस अगोदर प्लेअर लिस्ट (खेळाडूची यादी) बंद केली जाते. स्पर्धेच्या आदल्या दिवसी पाच वाजेपर्यत स्पर्धक, खेळाडूची प्रवेशिका निश्चित केली आहे. त्यामुळे लॉटस पडण्याचे काम सोपे होते.
सन २०२४-२५ या चालू शैक्षणिक वर्षाकरिता शहरस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या प्राथमिक अर्ज करण्याच्या प्रक्रियेला मंगळवार, दि. १५ जुलैपासून सुरुवात झाली खरी. मात्र तीन-चार दिवस झाले, प्राथमिक अर्ज दिसत नाही. त्यामुळे क्रीडा शिक्षकानी तक्रार केली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असलेले जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाचे वेब पोर्टलच (सांकेतिक स्थळ) उघडत नसल्याची तक्रारदेखील अनेक क्रीडा शिक्षकांनी कन्या न्यूजशी बोलताना केली होती. त्यापार्श्वभूमीवर क्रीडा अधिकारी सत्येन जाधव यांनी सांकेतिक स्थळाविषयी “कन्या न्यूज”शी सविस्तर माहिती दिली. सोलापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय असे दोन आहेत. त्यापैकी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हे ११ तालुक्यासाठी आहे.