पालकमंत्री जयकुमार गोरे;  क्रीडा संकुल सोयी-सुविधांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : जिल्हा क्रीडा संकुलमधून भविष्यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी जिल्हा क्रीडा संकुलामध्ये अधिकाधिक दर्जेदार सुविधा निर्माण करून द्याव्यात. तसेच संकुलाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी  दिल्या .       जिल्हाधिकारी कार्यालय  नियोजन भवन येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार,  जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप  पवार उपस्थित होते.

  • पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले,  जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण खेळाडू घडविण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात सध्या अनेक कामे सुरु आहेत. तसेच विविध क्रीडा प्रकारांच्या पायाभूत सुविधांची कामे जलदगतीने पूर्ण कराव्यात. नेहरूनगर येथील शासकीय मैदानावरील विविध सुविधाबाबतचा  आराखडा विहित पद्धतीचा अवलंब करून तयार करावा. तसा प्रस्ताव व अंदाजपत्रक लवकरात लवकर सादर करावा.

  • जिल्हा क्रीडा अधिकारी  नरेंद्र पवार म्हणाले, नेहरूनगर येथील शासकीय मैदानासाठी 9 एकर इतकी जागा उपलब्ध आहे. उपलब्ध जागेमध्ये 400 चा मीटरच्या धावपट्टीशी  संलग्नीत संलग्न वॉकिंग ट्रॅक आहे. विविध खेळाची मैदानी आहेत. या ठिकाणी खेळाडू, महिला, ज्येष्ठ, नागरिक हे सरावासाठी व व्यायामासाठी येत असतात. सदरचा वॉकिंग ट्रॅक जुना असल्याने मैदानाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.  मागील सभेचे इतिवृत्त वाचून जिल्हा क्रीडा संकुलात आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्याबाबतच्या कामांची सविस्तर माहिती दिली.

या बैठकीत जिल्हा क्रीडा संकुल येथे वाढीव क्रीडा सुविधा, 400 मी. धावन मार्ग सिंथेटिक करणे, बॅडमिंटन हॉल अद्ययावत करणे, मुलामुलींचे वसतीगृह दुरुस्त करणे, अंतर्गत रस्ते, सुंदरम नगर येथील जलतरण तलाव दुरूस्तीस निधी, उपलब्ध करण्यासाठी अंदाजपत्रके व आराखडे तयार करून घेण्यास मान्यता  मिळणे यासह अन्य कामांबाबत चर्चा करण्यात आली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *