दक्षिण तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम जाहीर
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचा (सन २०२५-२६) साठीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्यावतीने दक्षिण सोलापूर तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या सोमवार, दि. ११ ऑगस्टपासून तायक्वांदो या खेळापासून यंदाच्या शैक्षणिक वर्षातील दक्षिण सोलापूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ होत आहे. या स्पर्धा लोकसेवा विद्यामंदिर येथे १४ व १७ वर्षे वयोगटातील मुलामुलींसाठी होत आहेत.
स्पर्धा संयोजक म्हणून स्पर्धा प्रमुख नागनाथ धनाळे, उपप्रमुख शिवपुत्र म्हेत्रे, सहायक सुनील टेळे, अरविंद राठोड हे स्पर्धा संयोजनाचे काम पाहणार आहेत. असे जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांनी कळविले आहे.