दि. १३ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ दरम्यान नियम लागू
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : श्री सिध्देश्वर यात्रा महोत्सव सन- २०२५ निमित्त सोलापूर शहरात सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियममधील कलम १४२ अन्वये प्रदाने करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दि. १३ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ दरम्यान सोलापूर शहरातील सर्व देशी व विदेशी, ताडी विक्री अनुज्ञप्तीचे व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी दि. १३ जानेवारी २०२५ सायंकाळी ६ वाजेपर्यंत, दि. १४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजल्यानंतर व दि. १५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजल्यानंतर बंद ठेवावीत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.