“प्रत्येकाने समाजाची उतराई होणे गरजेचे “
सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांचा सत्कार
By Kanya News||
सोलापूर :आई-वडिलांनी प्रतिकूल परिस्थितीत मला घडविले. आज मंत्रालयात पत्रकारिता करीत आहे. जे समाजाने दिले आहे, ते समाजाला परत केले पाहिजे. समाजाची उतराई होणे गरजेचे आहे, असे सांगतानाच महाराष्ट्रात गढूळ वातावरण झाले आहे. राजकारणाचे अवमूल्यन झाले असल्याचे दिसून येते, असे प्रतिपादन राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांनी केले. राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी हे निवडीनंतर रविवारी प्रथमच सोलापूरला आले असताना त्यांचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने संघाच्या परिषद कक्षात सत्कार समारंभ पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी हे निवडीनंतर रविवारी प्रथमच सोलापूरला आले असताना त्यांचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने संघाच्या परिषद कक्षात सत्कार समारंभ पार पडला. श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते यदु जोशी आणि अर्चना जोशी यांचा श्री विठ्ठल- रुक्मिणी यांची मूर्ती, शाल व सोलापुरी बुके देऊन यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी विचारमंचावर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शांतकुमार मोरे, दशरथ वडतिले, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, माजी सरचिटणीस विजयकुमार देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केले. सूत्रसंचालन विजयकुमार राजापुरे यांनी केले. अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके यांनी आभार मानले. यावेळी विविध माध्यमांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यदु जोशी पुढे म्हणाले, आपण स्वच्छ राहणे आणि इतरांना स्वच्छतेचा आग्रह वर्तनातून धरणे आज महत्वाचे आहे. सोलापूरशी माझे आणि सोलापूरकरांचे माझ्याशी आत्मीयता आणि आपुलकीचे नाते आहे. त्या उपकारातून उतराई करण्याचा प्रयत्न राहील. महाराष्ट्रात सध्या गढूळ वातावरण दिसत आहे. जातीय संघर्ष पाहायला मिळतो. पाच वर्षात राजकारणाचे अवमूल्यन होत असल्याचे दिसून आले. लोकशाहीत काहीही घडू शकते, असेही ते म्हणाले.

सोलापूर :श्रमिक पत्रकार संघातर्फे राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांचा सत्कार धर्मराज काडादी यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी विक्रम खेलबुडे, सागर सुरवसे, विजयकुमार देशपांडे आदी.
राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी हे बोलतात आणि कृतीही करतात. जे मनात आहे ते लेखणीतून मांडले पाहिजे. लहान वयात त्यांनी या समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. पत्रकारांच्या विविध समस्या आणि प्रश्न त्यांच्या माध्यमातून मार्गी लागले आहेत. पत्रकारांना संघटनात्मक काम करताना कौटुंबिक जबाबदारीही पार पाडावी लागते. पत्रकारांना मदतीचा हात देण्याचे काम श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने केले जात आहे. ही समाधानाची बाब आहे, असे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी म्हणाले.