समस्त हिंदू समाजातर्फे दि. १९ ते २५ सप्टेंबर दरम्यान सोलापुरात

होणार छत्रपती श्री शिवाजी महाराज कथामाला

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : समस्त हिंदू समाजातर्फे दि. १९ ते २५ सप्टेंबर दरम्यान सोलापुरात होणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराज कथा कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी सरस्वती चौक जवळील पोलीस कल्याण केंद्र येथील ड्रीम पॅलेसमध्ये करण्यात आले.

प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन ह.भ.प. लक्ष्मण महाराज चव्हाण, अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह. भ. प. सुधाकर महाराज इंगळे, अच्युत महाराज मोकरे, विनोद महाराज सरवदे, भंते बोधिनाथ, ताई महाराज पाटील, डॉ. शिवयोगी शास्त्री, शुभांगी बुवा, पू. ज्ञानेश्वर महाराज वाघमारे, बळीराम जांभळे, श्री रमेश सिंगजी, संतोष पुजारी यांच्या हस्ते करुन कार्यालयाचे उद् घाटन करण्यात आले. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांची छत्रपती श्री शिवाजी महाराज कथा ऐकण्याची संधी सोलापूरकरांना मिळणार आहे. प्रारंभी छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेच्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती हेमंत पिंगळे यांनी दिली.

  • अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह. भ. प. सुधाकर महाराज इंगळे म्हणाले, श्रीराम कथा, श्रीकृष्ण कथा, भागवत कथेप्रमाणे छत्रपती श्री शिवाजी महाराजांची कथा सोलापुरात होत आहे. या कथेच्या श्रवणाचा लाभ सोलापूरकरांनी घ्यावा, असे आवाहनही केले.

याप्रसंगी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सल्लागार समिती सदस्य राजगोपाल मिणीयार, हेमंत पिंगळे, माजी महापौर शोभा बनशेट्टी, दास शेळके, सुधा अळीमोरे, संगीता जाधव, रोहिणी तडवळकर, संपदा जोशी, ॲड. नरसूबाई गदवालकर,  जगदाळे, माजी उपमहापौर पद्माकर काळे, सुदीप चाकोते, माजी नगरसेवक नागेश वल्याळ, श्रीशैल बनशेट्टी, जयेश पटेल, बिज्जू प्रधाने, दत्तात्रय वानकर, महादेव गवळी, प्रभूराज मैंदर्गीकर, गोपाल सोमाणी, प्रताप चव्हाण, श्रीनिवास दायमा, विजय पुकाळे, संदीप काशी, दिलीप पतंगे, तात्या वाघमोडे, सुनिल कदम, महेश धाराशिवकर, श्रीकांत डांगे, शशी थोरात, देविदास चेळेकर, नंदकिशोर मुंदडा, औदुंबरबुवा जगताप, अमर बिराजदार, कृष्णा हिरेमठ, मल्लिनाथ याळगी, श्रीनिवास दायमा, विष्णू जगताप, लहू गायकवाड, सुभाष पवार, राजू माने, विशाल गायकवाड, अमोल भोसले, विजय यादव, अरविंद गवळी, योगेश भोसले, सौराज चव्हाण, राहुल सलबत्ते, शेखर कवठेकर, अमित कदम, वामन वाकचौरे, अजय निंबाळकर, भागवत कोटमाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश शिरते, संतोष स्वामी, संदीप जाधव, अंबादास गोरंटला, रणधीर स्वामी, विनोद केंजरला आदींनी परिश्रम घेतले. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सल्लागार समिती सदस्य सी. ए. राजगोपाल मिणीयार यांनी प्रास्ताविक केले. सागर अतनुरे यांनी सूत्रसंचालन तर महेश धाराशिवकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact