मंगळवारी निघणार्या मोर्चात विविध १५ संघटना सहभाग नोंदवणार
By Kanya News||
सोलापूर : सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठच्यावतीने शासन दरबारी प्रलंबित असलेल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मंगळवार, दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता चार हुतात्मा पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शैक्षणिक व्यासपीठचे अध्यक्ष सुभाष माने व समन्वयक तानाजी माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापूर जिल्हातील विविध शैक्षणिक संघटनाना एकत्रित करून सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ निर्माण केले आहे. या शैक्षणिक व्यासपीठच्या माध्यमातून मंगळवारी (दि. ६ ऑगस्ट) काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थेचे संस्थाचालक, पदाधिकारी, विविध शैक्षणिक संघटनेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक सहभागी होणार आहेत. मंगळवारी (दि. ६ ऑगस्ट) रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेऊन शैक्षणिक व्यासपीठच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात येणार आहे. यादिवशी शाळा बंद ठेऊन मोर्चा काढल्यामुळे विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी रविवार, दि. ७ ऑगस्ट रोजी शाळा पूर्ण वेळ भरविण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस शांतलिंग शटगार, मुस्ताक शेतसंदी, शोएब बलोलखान, श्रावण बिराजदार, रंगसिद्ध दसाडे, रविशंकर कुंभार, बापू नीळ, मारुती तोडकर, महारुद्र पाटोळे आदी उपस्थित होते.
======================================================================================================
मोर्चात या १५ संघटना नोंदवणार सहभाग
या शैक्षणिक मोर्चामध्ये जून पेन्शन हक्क संघटना, सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, संस्थाचालक संघटना, विनानुदानित शाळा कृती समिती, शिक्षक परिषद, माध्यमिक शिक्षक संघ, शहर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना महासंघ, शिक्षक भारती, स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेतर सेना, क्रीडा शिक्षक महासंघ, स्वाभिमानी शिक्षक संघटना, बहुजन शिक्षक संघटना, प्रहार शिक्षक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, सोलापूर जिल्हा कॉंग्रेस शिक्षक सेल, आश्रम शाळा संघटना, महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ शाखा सोलापूर, कनिष्ट महाविद्यालय शिक्षक संघटना, अल्पभाषिक व अल्पसंख्यांक संस्था चालक संघटना, सोलापूर जिल्हा उर्दू शिक्षक संघटना, महाठोका शिक्षक संघटना, सोलापूर जिल्हा उर्दू माध्यमिक मुख्याध्यापक संघ, राष्ट्रवादी शिक्षक संघटना अशा विविध १५ संघटना या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.