सोलापूर जिल्ह्यातील तरुणांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सादरीकरणाची संधी
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : जगभरातील तरुणांना व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टतेच्या आधारे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सादर करण्याची अनोखी संधी मिळणार आहे. सन 2026 मध्ये आयोजित होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेचे आयोजन चीनमधील शांघाई येथे होणार आहे. ही स्पर्धा जगातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित व्यावसायिक कौशल्य स्पर्धा मानली जाते.
सन 2026 मधील स्पर्धेसाठी भारताच्या विविध राज्यांमधून पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरांवर कौशल्य स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील तरुण-तरुणींनाही सहभाग घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्किल स्पर्धा विभाग, तसेच विविध औद्योगिक आस्थापनांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा तीन टप्प्यांमध्ये राबवली जाणार असून, त्यामधून निवड झालेल्या उमेदवारांना राष्ट्रीय स्तरावर आणि त्यानंतर जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयाचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. सामान्यतः 50 कौशल्य क्षेत्रांसाठी उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 2004 किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे.
Additive Manufacturing, Cloud Computing, Cyber Security, Digital Construction. Industrial Design Technology, Mechatronics, Robot System Integration, Water Technology, ICT Network Infrastructure, Industry 4.0, Optoelectronic Technology, Dental Prosthetics व Aircraft Maintenance या प्रगत क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 2001 किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे. इतर 50 क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी, 2004 किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सर्व शासकीय आणि खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्था, एमएसएमई, टूल रुम्स, सिपेट, आयआयटी, अभियांत्रिकी महाविदयालये, तंत्रनिकेतन महाविदयालये, आयएचएम/हॉस्पिटॅलिटी इन्स्टिटयूट्स, कॉर्पोरेट टेक्निकल इन्स्टिट्यूट, स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र राज्य कौशल्य विदयापीठ, एमएसवीव्हीईटी, खाजगी कौशल्य विदयापीठ, फाईन आर्टस कॉलेज, फ्लॉवर ट्रेनिंग इन्स्टिटयूट, इन्स्टिट्यूट ऑफ ज्वेलरी मेकिंगसह इतर सर्व महाविदयालये व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांमधील उमेदवारांची नोंदणी करता येईल.
या स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत https://www.skillindiadigital.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. या संधीचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन असे आवाहन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त, श्रीमती संगीता खंदारे यांनी केले आहे